Misuse of Aishwarya Rai Bachchan Photos: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या बाजूने दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की तिचे नाव, फोटो किंवा व्यक्तिमत्त्वाशी संबंधित कोणतीही सामग्री अभिनेत्रीच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही. न्यायाधीश तेजस कारिया यांनी अनेक कंपन्यांचा उल्लेख करताना सांगितले की, सेलिब्रिटींच्या ओळखीचा गैरवापर केवळ आर्थिक हानीच करत नाही, तर त्यांच्या प्रतिष्ठेला देखील गंभीर धक्का पोहोचवतो.
हेही वाचा - Ameya Khopkar ON Kapil Sharma : 'कपिल शर्माला चालेल का त्याचा उल्लेख टपिल शर्मा केलेला?'; अमेय खोपकर आक्रमक
कोर्टाने सांगितले की जर एखादी संस्था किंवा व्यक्ती ऐश्वर्या राय बच्चनच्या ओळखीचा गैरवापर करत असेल, तर लोकांमध्ये असा भ्रम निर्माण होतो की ती त्या उत्पादनाशी किंवा सेवेशी संबंधित आहे. परिणामी तिच्या प्रतिष्ठा आणि नावाचा गौरव कमी होतो. तथापी, न्यायालयाने असेही नमूद केले की व्यक्तीची ओळख आणि प्रतिष्ठा तिच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या अधिकाराचा उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीच्या जीवनावर आणि प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोर्टाने परवानगीशिवाय कोणत्याही माध्यमातून तिचा फोटो, नाव किंवा व्यक्तिमत्त्व वापरणे प्रतिबंधित केले आहे.
हेही वाचा - Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या रायने ठोठावला दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा; नेमकं काय घडलं? जाणून घ्या
विशेष म्हणजे, हा निर्णय व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांबाबत एक मोठे पाऊल मानला जात आहे. याआधी अनेक सेलिब्रिटींनी आपल्या ओळखीचा गैरवापर झाल्याबाबत तक्रारी केल्या होत्या. न्यायायलयाच्या या आदेशामुळे भविष्यात अशा घटनांवर कठोर नियंत्रण ठेवता येईल. दरम्यान, उच्च न्यायालयाचा हा आदेश संपूर्ण मनोरंजन उद्योगासाठी उदाहरण ठरू शकतो.