Thursday, September 11, 2025 10:41:59 PM

Prithvi Shaw-Sapna Gill Case : छेडछाडप्रकरणी पृथ्वी शॉला न्यायालयाने फटकारले; उत्तर न दिल्याने ठोठावला 100 रुपयांचा दंड

शॉला यापूर्वी उत्तर दाखल करण्याची अंतिम संधी दिली होती, परंतु त्यांनी कोणतेही उत्तर न्यायालयात सादर केले नाही.

prithvi shaw-sapna gill case  छेडछाडप्रकरणी पृथ्वी शॉला न्यायालयाने फटकारले उत्तर न दिल्याने ठोठावला 100 रुपयांचा दंड

Sapna Gill Molestation Case: दिंडोशी सत्र न्यायालयाने टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉला 100 रुपयांचा दंड ठोठावला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिलच्या याचिकेवर उत्तर दाखल न केल्याबद्दल न्यायालयाने ही कारवाई केली. शॉला यापूर्वी उत्तर दाखल करण्याची अंतिम संधी दिली होती, परंतु त्यांनी कोणतेही उत्तर न्यायालयात सादर केले नाही.

काय आहे नेमकं प्रकरण? 

प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण फेब्रुवारी 2023 चे आहे, जेव्हा मुंबईतील अंधेरी येथील एका पबमध्ये सपना गिल आणि पृथ्वी शॉ यांच्यात वाद झाला होता. गिलचा आरोप आहे की त्याच्या एका मित्राने शॉकडून सेल्फी मागितली होती, परंतु शॉने नकार दिला आणि फोन हिसकावून फेकून दिला. सपना गिलने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शॉ आणि त्याच्या मित्रांनी तिला मारहाण करून त्रास दिला आणि शॉवर विनयभंगाचा आरोपही केला.

हेही वाचा - IND vs PAK vs Live Streaming: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना थेट पाहण्यासाठी एकापेक्षा अधिक पर्याय; कुठे पहाल सामना? जाणून घ्या

सपना गिलने पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. नंतर तिने अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले. एप्रिल 2014 मध्ये, मॅजिस्ट्रेट कोर्टाने पोलिसांना कलम 202 सीआरपीसी अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा - Supreme Court on India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान सामना होणारच! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ठाकरे गटाची गोची?

न्यायालयाचा संताप आणि दंड

दिंडोशी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम. आगरकर यांनी शॉच्या वकिलाला वारंवार उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला, पण प्रत्येक वेळी विलंब झाला. पृथ्वी शॉला 13 जून रोजी अंतिम संधी देण्यात आली, तरीही उत्तर आले नाही. 9 सप्टेंबर रोजी न्यायालयाने शॉला 100 रुपयांचा दंड ठोठावून आणखी एक संधी दिली आहे. पुढील सुनावणीत शॉ उत्तर दाखल करतो की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री