Sunday, August 31, 2025 05:40:23 PM

Mahashivratri 2025 : यंदाची महाशिवरात्री कशी आहे खास? महाशिवरात्रीचे महत्त्व आणि उपवासाचे कारण

महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा सण भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी उपवास करून शिवपूजा केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता.

mahashivratri 2025  यंदाची महाशिवरात्री कशी आहे खास महाशिवरात्रीचे महत्त्व आणि उपवासाचे कारण

 महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा सण भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी उपवास करून शिवपूजा केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता, असे मानले जाते. संपूर्ण देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. यंदाची महाशिवरात्री 2025 विशेष मानली जात आहे.  कारण शास्त्रानुसार ही तिथी अत्यंत शुभ फलदायी मानली जाते. शिवभक्तांसाठी हा दिवस महत्त्वाचा असून, भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होण्यासाठी विविध पूजाअर्चा, रुद्राभिषेक आणि उपवास केले जातात.

महाशिवरात्रीचे महत्त्व: 
महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकर आणि देवी पार्वतीच्या विवाहाचा पवित्र दिवस. या दिवशी भगवान शिवाने कैलास पर्वतावर माता पार्वतीशी विवाह केला होता, अशी पौराणिक मान्यता आहे. तसेच, हा दिवस ‘शिव तत्व’ म्हणजेच सृष्टीच्या उत्पत्तीचे आणि संहाराचे प्रतीक मानला जातो. याशिवाय, या दिवशी भगवान शिवाने कालसर्प दोष नष्ट केला, अशीही श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला 'शिव तत्व' सर्वात सक्रिय असते, त्यामुळे या दिवशी उपवास, ध्यान आणि जप केल्याने विशेष फलप्राप्ती होते.

हेही वाचा: Shivsena vs BJP: शिवसेना भाजपात विलीन होणार?

यंदाची महाशिवरात्री का आहे खास ?
यंदा महाशिवरात्रीला विशेष शुभ संयोग आहे. ग्रहस्थितीनुसार या दिवशी शनि आणि गुरुची विशेष युती असल्याने भक्तांना अधिक फलदायी अनुभव मिळण्याची शक्यता आहे. तसेच, शास्त्रानुसार महाशिवरात्रीला बेलपत्र, दूध, गंगाजल आणि पंचामृत अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. देशभरातील प्रसिद्ध शिव मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्मआरती, वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात गंगा आरती आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात विशेष पूजा होणार आहे.

महाशिवरात्रीला उपवास का करतात?
उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नव्हे, तर शरीर आणि मन यांचे शुद्धीकरण करण्याची संधी. या दिवशी उपवास केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.संशोधनानुसार, उपवास केल्याने शरीरातील टॉक्सिन्स, चिडचिडेपणा कमी होतो आणि मन अधिक शांत राहते. याशिवाय, भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी भक्त रात्रभर जागरण, मंत्रजप आणि ध्यान करतात.

महाशिवरात्रीची पूजा: 
शिवाच्या शिवलिंगाला बिल्वची पाने, दूध, मध आणि जल अर्पण करावे.
मंत्रांचा जप करावा.
महाशिवरात्री गाणी गावा.
“ओम नमः शिवाय” चा उच्चार करणे शुभ मानले जाते. 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री