सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरुद्ध एका 45 वर्षीय विवाहित महिलेसोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, विनयभंग व दमदाटी केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार पीडिता या पुणे येथे रहातात.त्या मूळ उत्तर सोलापूर तालुक्यातील आहेत.गावातील शेतीच्या वादामुळे कोर्ट केस सुरू आहे.त्यासाठी त्या सोलापुरात वकिलांना भेटण्यासाठी आल्या होत्या.14 जूनला माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या मालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये सुरुवातीचे दोन दिवस रूम नंबर 202 तर पुढील दोन दिवस रूम नंबर 205 मध्ये त्यांनी वास्तव्य केले.
हेही वाचा: माजी आमदार राजा राऊत यांच्या चिरंजीवाचा शिव्या देतानाचा व्हिडीओ वायरल
16 जूनच्या मध्यरात्री बाराच्या सुमारास मनोहर सपाटे यांनी पीडितेच्या रूमचा दरवाजा ठोठावून त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.त्यांच्याशी अश्लील हावभाव करीत विनयभंग केला.पिडीतने घाबरून तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, असे का करता, असे विचारले.तेव्हा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत तू कुठेही तक्रार केली, तरीही मला काही फरक पडत नाही.
कारण माझे वय जास्त असल्यामुळे मला लगेच जामीन मिळतो, असे सांगत दमदाटी केली.त्यानंतरही वारंवार मोबाईलवरून त्यांनी पिडीतेशी संपर्क साधून शारिरीक संबंध ठेवण्याचा आग्रह केला.त्यानंतर पिडीता 24 जूनला अॅड.योगेेश पवार यांचा सल्ला घेण्याकरिता गेल्या.त्याचवेळी पिडीतेला सपाटे यांचा फोन आला. लॉजवरील रूम नंबर 307 वर येण्याचा आग्रह सपाटेंनी केला.
हेही वाचा: बुलढाण्यात रुग्णाची आर्थिक पिळवणूक; महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार असूनही मागितले 25 हजार रुपये
त्यावेळी पिडीतेने स्टिंग ऑपरेशन करण्याचे ठरविले. 24 जूनला संध्याकाळी रूम नं. 307 मध्ये जाऊन सपाटेंच्या कृत्याचे व्हिडिओ काढले.त्या व्हिडिओत सपाटे यांनी पिडीतेचा विनयभंग केल्याचे दिसून येते.या व्हिडिओतील पुराव्याच्या आधारे पीडितेने 25 जूनला फौजदार चावडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.त्यानुसार सपाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.