नवी मुंबई: सद्या महिला सुरक्षित नाही असं बोललं जात परंतु हे कुठेतरी खरंच आहे असं समोर येतंय. त्यातच आता नवी मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. नवी मुंबईमध्ये सासरच्यांकडून विवाहितेचा छळ होत असल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे एकतर गर्भपात नाहीतर धर्म बदल असं विवाहितेला सांगण्यात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालीय. लग्नानंतर पती पत्नीमध्ये मतभेत झाल्यानंतर पत्नीने नवऱ्याकडे गर्भपात करण्याबाबत विनंती केली होती. मात्र पतीने आधी धर्म परिवर्तन कर मगच गर्भपात करण्याची परवानगी देतो, अशी धमकी दिली. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.
हेही वाचा: Beed: वाल्मिक कराडनंतर आणखी एका टोळीचा पर्दाफाश
नेमकं काय आहे प्रकरण?
चार महिन्यापूर्वी पीडित तरुणीचा विवाह आकाश आरीफ शेख नावाच्या तरुणासोबत झाला होता. दोघांनी प्रेम विवाह केला होता, मात्र या लग्नाला मुलीच्या घरच्यांकडून विरोध होता. मुलीच्या आई वडिलांनी लग्नाला विरोध करून मुलीला त्याच्यापासून वेगळे होण्यास सांगितलं. त्यानुसार, मुलीने पतीला सोडून आपल्या आई वडिलांसोबत वेगळं राहायला सुरुवात केली.
मात्र त्यानंतर आकाशने फिर्यादी पत्नीला घरी आणि बेलापूर येथे भेटण्यासाठी बोलावलं. दोघांचे फोटो व्हायरल करेन, बॅनर बनवून फोटो लावेन. तुझ्या चुलत्यांची आणि खानदानाची बदनामी करेन, अशा प्रकारची धमकी देत आरोपी पतीने फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून फिर्यादी गर्भवती राहिल्या. मात्र आपल्याला अडचण येणार असल्याने आपल्याला अबॉर्शन करायचे असल्याचे पीडितेन पती आकाशला सांगितलं.
मात्र पती आकाश शेख आणि पतीचे वडील आरीफ शेख यांनी आधी धर्म परिवर्तन कर, नाहीतर तुझे अबॉर्शन होऊ देणार नाही, अशी धमकी दिली, असं तक्रारीत म्हटलं आहे. यानंतर पत्नीने उलवे पोलीस ठाण्यात जाऊन पती आकाश आणि त्याच्या वडिलांवर तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र गर्भपात करण्यासाठी धर्म बदलण्याची अट टाकल्याने नवी मुंबई परिसरात एकच खळबळ उडाली आहे.