Thursday, September 04, 2025 01:37:08 PM

Stock Market Today: GST दर कपातीच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 547 अंकांनी झेपावला, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

या निर्णयाचा देशांतर्गत शेअर बाजारावर तात्काळ परिणाम झाला आणि बाजारात आज जबरदस्त तेजी पाहायला मिळाली.

stock market today gst दर कपातीच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी सेन्सेक्स 547 अंकांनी झेपावला या शेअर्समध्ये मोठी वाढ

Stock Market Today: बुधवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कर दरांमध्ये मोठी कपात जाहीर करण्यात आली. या निर्णयाचा देशांतर्गत शेअर बाजारावर तात्काळ परिणाम झाला आणि बाजारात आज जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी सकाळी व्यवहाराच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स 573.96 अंकांच्या वाढीसह 81,141.67 वर पोहोचला. तर एनएसई निफ्टी देखील 162.05 अंकांनी उडी घेत 24,877.10 वर व्यवहार करताना दिसला.

जीएसटी कौन्सिलचा निर्णय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जीएसटीची रचना सोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता केवळ 5% आणि 18% असे दोनच स्लॅब लागू असतील, तर लक्झरी वस्तूंवर 40% विशेष कर आकारला जाईल. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा - Health Insurance Premium: GST हटवल्यानंतर आरोग्य आणि जीवन विमा किती स्वस्त झाला? जाणून घ्या

टॉप गेनर्स आणि लूजर्स

आजच्या सत्रात बजाज फायनान्स, एचयूएल, ग्रासिम इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह आणि ट्रेंट हे निफ्टीवरील प्रमुख वाढणारे शेअर्स ठरले. याउलट, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंडाल्को इंडस्ट्रीज, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि ओएनजीसी यांचे शेअर्स घसरले.

हेही वाचा - Zomato Hikes Platform Fee: ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे झाले महाग; झोमॅटोने प्लॅटफॉर्म फीमध्ये केली 20 टक्के वाढ

एफएमसीजी आणि विमा क्षेत्रात तेजी

ब्रिटानिया, कोलगेट आणि इमामीसारख्या एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर्सनी चांगली उसळी घेतली. त्याचबरोबर, एलआयसी, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफसारख्या विमा कंपन्यांच्या समभागांमध्येही 10% पर्यंत वाढ दिसली.

चलन बाजारातील हालचाल

दरम्यान, परकीय चलन बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 1 पैशाने घसरून 88.03 रुपयांवर बंद झाला. जागतिक तेल दरातील घसरण आणि जीएसटी निर्णयामुळे रुपयातील कमजोरी मर्यादित राहिली. एकंदरीत, जीएसटी दर कपातीच्या निर्णयाने बाजारातील भावना सुधारल्या असून गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे.


सम्बन्धित सामग्री