GST Changes: सरकारने दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. बुधवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटीच्या दरांमध्ये मोठी कपात जाहीर केली. या निर्णयामुळे अनेक वस्तू आणि सेवांवर कर कमी झाला असून काही लक्झरी वस्तूंवर ‘पाप कर’ म्हणून जास्त दर आकारण्यात आला आहे. नवीन जीएसटी स्लॅब 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
काय स्वस्त झाले? (0 टक्के स्लॅब)
दूध, पनीर, छेना
खाखरा, चपाती, ब्रेड
नकाशे, चार्ट, ग्लोब
पेन्सिल, शार्पनर, नोटबुक, खोडरबर
33 जीवनरक्षक औषधे (कर्करोग, दुर्मिळ आजारांसाठी)
वैयक्तिक जीवन व आरोग्य विमा
5 टक्के स्लॅब
लोणी, तूप, चीज आणि दुग्धजन्य पदार्थ
केसांचे तेल, टूथपेस्ट, साबण, शेव्हिंग क्रीम
कृषी यंत्रसामग्री, ठिबक सिंचन उपकरणे, स्प्रिंकलर
ट्रॅक्टर टायर, सुटे भाग
थर्मामीटर, वैद्यकीय ऑक्सिजन, ग्लुकोमीटर, चाचणी पट्ट्या
चष्मे
18 टक्के स्लॅब
350 CC पर्यंतच्या मोटारसायकली
एअर कंडिशनर
डिशवॉशर
एलईडी आणि एलसीडी टीव्ही (32 इंचांपेक्षा जास्त)
तीनचाकी वाहने
सीएनजी/एलपीजी कार (1200 CC आणि 4000 mm पेक्षा कमी)
हेही वाचा - Health Insurance Premium: GST हटवल्यानंतर आरोग्य आणि जीवन विमा किती स्वस्त झाला? जाणून घ्या
काय महाग झाले?
40 टक्के पाप कर स्लॅब
थंड पेये, कार्बोनेटेड व साखरेचे पदार्थ
पान मसाला, गुटखा, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ
1200 CC पेक्षा जास्त इंजिन क्षमता व 4000 mm पेक्षा लांब कार
350 CC पेक्षा जास्त मोटारसायकली, रेसिंग कार
खाजगी विमान, बोटी
रिव्हॉल्व्हर व पिस्तूल
कॅसिनो, लॉटरी, जुगार, घोड्यांच्या शर्यती
ऑनलाइन गेमिंग, IPL सारख्या क्रीडा स्पर्धांचे तिकिट
हेही वाचा - Stock Market Today: GST दर कपातीच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 547 अंकांनी झेपावला, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ
जीएसटीमधील या बदलांमुळे घरगुती वापराच्या वस्तू आणि आरोग्याशी संबंधित सेवा स्वस्त झाल्या आहेत. मात्र, लक्झरी वस्तू, तंबाखूजन्य पदार्थ आणि मनोरंजनाशी निगडित सेवा महागल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असून सरकारने महसुली समतोल राखण्यासाठी लक्झरी व पाप कर कडक केला आहे.