Thursday, August 21, 2025 12:39:46 AM

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन तापणार ?

पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन तापणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. पुण्यातील सहा विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन तापणार  

२१ ऑगस्ट, २०२४, पुणे : पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन तापणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. पुण्यातील सहा विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. 
मागील २४ तासांपासून पुण्यातील शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. मागण्या मान्य होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. दोन विद्यार्थिनींसह सहा जण उपोषणाला बसले आहेत. एमपीएससी आयोग जोपर्यंत नोटिफिकेशन काढत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा पवित्रा घेतला आहे. कोमल सरिक,आश्विनी बऱ्हाटे, नितीन आंधळे, लेशपाल जवळगे, प्रवीण पाटील, श्रीनिवास गुट्टे, अशी उपोषणकर्त्यांची नावं आहेत. 


सम्बन्धित सामग्री