कोल्हापूर : पन्हाळा किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यास पन्हाळावासियांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जागतिक वारसा घोषित झाल्यास अनेक बंधने येणार असल्याचे पन्हाळावासियांचे म्हणणे आहे.
पन्हाळा किल्ल्यासह अन्य 11 किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. जागतिक वारसा स्थळात पन्हाळ्याचा समावेश झाल्यास अनेक बंधने येतील. नागरिकांना बांधकाम करताना तसेच व्यवसाय करताना अडचण निर्माण होतील. महाराष्ट्र शासनाचे सचिव खरगे यांनी युनोस्कोचे कोणतेही नियम नाहीत. सध्या जे पुरातत्त्व खात्याचे जे नियम आहेत. त्यापेक्षा वेगळे कोणतेही नियम नाहीत असे सांगितले होते. तसेच राजस्थानमधील जैसलमेर किल्ला हा पन्हाळा किल्ल्यासारखा नागरी वस्ती असलेला किल्ला असून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती.
हेही वाचा : 'दत्तक प्रक्रियेत महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी'
पन्हाळा युनेस्को विरोधी कृती समितीच्या वतीने येत्या 10 एप्रिल 2025 रोजीपर्यंत पन्हाळावासियांची बैठक बोलावून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास पन्हाळा नागरिक पन्हाळा बंद हाक देऊन रस्ता रोको, साखळी उपोषण असे पर्याय स्विकारून पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यास तीव्र विरोध करतील. यावेळी अॅडवोकेट रवींद्र तोरसे, रामानंद गोसावी, किरण महाजन, रमेश स्वामी, जीवन पाटील, चंद्रकांत गवंडी, आदी. नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.