ठाणे: ठाण्यात 15 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. बेशिस्त पोलिसांना दणका देण्याचे काम करण्यात आले आहे. पोक्सोचा आरोपी ताब्यातून पळून गेल्याने सहा पोलिसांना निलंबित केले. तसेच आरोपीला बेड्या न घालता विनासुरक्षा बसवून ठेवल्याबद्दल नऊ पोलिसांना निलंबित केले.
ठाणे पोलीस दलातील 15 पोलिसांना निलंबित केले आहे. पोक्सोचा आरोपी ताब्यातून पळून गेल्याने 6 पोलीस निलंबित तर आरोपींना वैद्यकीय चाचणी करण्यासाठी हॅास्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यावेळी आरोपीला फोन वापरु दिला तसेच एका आरोपीला बेड्या न घालता बाहेर विना सुरक्षा बसवून ठेवल्याबद्दल 9 पोलिसांना निलंबित करण्यात आले.
हेही वाचा: मोदींकडून लाडक्या बहिणींना बारा हजार कोटींची ओवाळणी
आरोपी कसे पळाले?
भिवंडी येथील आरोपीला कोर्टात हजर करताना शस्त्रधारी पोलिसांच्या हातातून आरोपी फरार झाला. कोर्टात हजर करण्याकरता आरोपीला घेऊन जाताना पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी झाला. बिहार राज्यातील 32 वर्षीय सलामत अली अंसारी असं आरोपीचे नाव आहे. भिवंडी शहर पोलीस स्टेशनमधील आरोपी कोर्टात घेऊन जाताना फरार झाला. गर्दीचा फायदा घेत आरोपीने पोलिसांच्या हाती तूरी देत पळ काढला.
15 पोलीस निलंबित
ठाण्यातील 15 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. अमोल तरटे, मोतीराम ढेबरे, दत्ता सरकटे, दिपक इंगळे, विकास चाटे आणि संगीता चोखंडे ही निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. पुढील आदेश येईपर्यंत 6 पोलीस निलंबित राहणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत रोज ठाणे पोलीस मुख्यालयात निलंबित 6 पोलिसांना हजेरी द्यावी लागणार आहे. तर, गंगाराम ज्ञानदेव घुले, गिरीष भिकाजी पाटील, विलास जगन्नाथ मोहिते, किशोर शिर्के, अशोक विश्वंभर मुंडे, संदिप सुर्यकांत खरात, सुनिल दिनकर निकाळजे, भरत संग्राम जायभाये सर्व नेमणूक पोलीस मुख्यालय आणि ठाणे शहर येथे नेमणूक असलेले विक्रम आनंदा जंबुरे या 9 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.