Wednesday, August 20, 2025 08:35:12 PM

रक्षकच बनला भक्षक; पोलिसाने शिक्षिकेवर केला अत्याचार, धक्कादायक प्रकार उघड

शिक्षिकेवर पोलिस कर्मचाऱ्याने खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघड, इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

रक्षकच बनला भक्षक पोलिसाने शिक्षिकेवर केला अत्याचार धक्कादायक प्रकार उघड


नाशिक: 'जे रक्षण करतात, त्यांच्याचकडून भक्षण होऊ लागलं तर नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची?' असा प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. इथे एका शिक्षिकेवर एका पोलीस कर्मचाऱ्याने मानसिक आणि शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित पोलिसाने पीडित शिक्षिकेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सातत्याने त्रास दिला आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे पोलिस दलावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या आरोपीचा शिक्षिकेशी जुना परिचय होता. त्या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिच्याशी संपर्क वाढवला. शिक्षिका लग्नानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यात रमली होती, मात्र तरीही संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने तिला त्रास देणं सुरूच ठेवलं. काही खाजगी क्षणांचे व्हिडिओ असल्याचा दावा करत त्याने ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि या दबावाखाली पीडितेवर शारीरिक अत्याचार केला.

हेही वाचा: राज्यात ढगफुटीसारख्या अवकाळी पावसाचा तडाखा; द्राक्ष बागायतदार आणि शेतकरी संकटात

या प्रकरणी पीडितेने अखेर धैर्य दाखवून इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत.

सदर घटना समाजात प्रचंड संतापाचा विषय बनली आहे. हा प्रकार केवळ एका शिक्षिकेचा नाही, तर प्रत्येक महिलेसाठी धोक्याची घंटा आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलिस खात्याने स्वतःमध्येच कठोर शिस्त आणण्याची गरज आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्याला वाचवण्याऐवजी त्याच्यावर तात्काळ कारवाई करून एक आदर्श उभा करण्याची वेळ आली आहे. समाजातील रक्षक जरच भक्षक बनू लागले, तर हा अंधार पसरवणारा काळ मानायला हवा.


सम्बन्धित सामग्री