बार्शी: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील माजी आमदार राजा राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत यांचा सोशल मीडियावर शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे.बार्शीत सुरक्षित राहायचं का नाही,अन्यथा तुम्हा सर्वांची मान मुरगाळेन अशी धमकी रणवीर राऊत देतानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे.चार चाकी वाहनाची कट मारल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली आहे असे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे .रणवीर राऊत शिवीगाळ करताना,तुमच्या आज्याने आमचं काम केलं म्हणून तुम्हाला सोडून देत आहे नाही तर तुम्हाला झेपवणार नाही अशी धमकी देत आहे.बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या नावाचा उल्लेख करत रणवीर राऊत शिवीगाळ करत आहेत ,तर बारबोले यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे.राजकारण करायचं तर करा,राजकारणात वाकड पाऊल नको ,नाही तर राजकारण गेलं झकमारत अशी धमकी देतानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे.
हेही वाचा: अमेरिका इराणला करणार 30 अब्ज डॉलरची मदत; अणुप्रकल्प नष्ट केल्याच्या दाव्यानंतर मोठा यू-टर्न
2019 साली राजा राऊत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत विधानसभा निवडणुक जिंकली होती.2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून विधानसभा लढवली होती.मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरें शिवसेनेचे दिलीप सोपल यांनी राजा राऊत यांचा पराभव केला. रणवीर राऊत हे माजी आमदार राजा राऊत यांचे मोठे चिरंजीव आहेत.बार्शी मार्केट कमिटीमध्ये चेअरमन पद देखील रणवीर राऊत यांनी भूषवले आहे.सद्यस्थितीला रणवीर राऊत डाळ मिलचा कामकाज सांभाळत आहेत.
सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडीओ बाबत अधिक माहिती घेतली असता जवळपास आठ दिवसांपूर्वीचे व्हिडीओ आहे.रणवीर राऊत यांचा मित्र चार चाकी वाहन घेऊन जाताना दुसऱ्या एका चार चाकी वाहनाची कट बसली. यावरून वादास तोंड फुटले.बाचाबाची होत असताना,रणवीर राऊत यांना बोलावले आणि वाद विकोपाला गेला.वादविवाद करणारे तरुण हे विरोधी पक्षातील किंवा विरोधी गटातील असल्याने रणवीर राऊत यांच्या रागाचा पारा चढला आणि शिवीगाळ केली.वादविवाद होताना रणवीर राऊत आल्याने समोरच्या तरुणांनी नमती भूमिका घेतली आणि शिवीगाळ करताना व्हिडीओ चित्रीकरण केले.रणवीर राऊत शिवीगाळ करताना व्हिडीओ बार्शी तालुक्यातील देखील प्रचंड वायरल झाला असून रणवीर राऊत यांच्या व्हिडीओची मोठी चर्चा सुरू आहे.