मुंबई : अवघ्या काही दिवसांवर गणपती उत्सव आला आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांकरता राज्य सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांना बंद घालण्यात येणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्हा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. साधारण 23 ते 28 ऑगस्ट या कालावधीत मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. यासंबंधीचे आदेश शासनाच्या गृह विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.
हेही वाचा : ‘Agni 5’ Ballistic Missile : भारताने घेतली अग्नी-5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
पुढील आठवड्यात बुधवारी, 27 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे 23 ऑगस्टपासूनच महामार्गावर कोकणात गणेशभक्त येण्यासाठी सुरुवात होणार आहे. हे नियोजन लक्षात घेऊन मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांसाठी असलेला बंदी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. 23 ऑगस्ट रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 हने चीज 16 किया टनापेक्षा जास्त असणाऱ्या वाहने, ट्रक, मल्टीएका ट्रेलर, ट्रक आदी वाहनांना वाहतुकीस पूर्णतः बंदी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना मात्र यातून वगळण्यात आलं आहे.