मालेगाव: नाशिक जिह्यातील मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9:35 वाजल्याच्या सुमारास भिक्खू चौकातील एका हॉटेलजवळ मोठा बॉम्ब स्फोट झाला होता. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल 17 वर्षांनंतर, पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (निवृत्त) यांच्यासह, 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या निकालामुळे हिंदुत्त्ववाद्यांना दिलासा मिळाला आहे.
विशेष न्यायालयाने हा निकाल 17 वर्षे राखून ठेवला होता. याबाबतीत, गुरूवारी विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. 29 सप्टेंबर 2008 रोजी, रात्री 9:35 वाजल्याच्या सुमारास मोठा बॉम्ब स्फोट झाला होता. यात 101 जण जखमी झाले होते.
हेही वाचा: Malegaon Blast Final Verdict: मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणी मोठा निकाल, सर्व आरोपी निर्दोष
कोण आहे साध्वी प्रज्ञासिंह?
साध्वी प्रज्ञासिंह उर्फ प्रज्ञासिंह ठाकूर यांचा जन्म 2 फेब्रुवारी, 1970 रोजी लाहार, भिंड, मध्य प्रदेश, भारत येथे झाला. साध्वी प्रज्ञासिंह भारतीय जनता पक्षाची राजकारणी आणि धर्मगुरू आहे. महाविद्यालयाच्या काळापासून साध्वी प्रज्ञासिंह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (एबीव्हीपी) सक्रिय सदस्य होत्या आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये सामील झाल्या. साध्वी प्रज्ञासिंह यांचे वडील चंद्रपालसिंग हे भिंड येथील आयुर्वेदिक अभ्यासक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कामगार होते.
माहितीनुसार, त्यांना मोटारसायकल चालवायला खूप आवडायचे. तसेच, घटनास्थळी त्यांच्या नावावर असलेली मोटारसायकल सापडल्याने साध्वी प्रज्ञा सिंह यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती, ज्यामुळे त्यांना दहशतवादी कारवाईचा सामना करावा लागला. मात्र, पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञासिंह यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
हेही वाचा: Today's Horoscope: 'या' राशीसाठी आजचा दिवस खर्चीक; जाणून घ्या
निर्दोष सुटका झाल्यानंतर कर्नल पुरोहित काय म्हणाले?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निकाल लागल्यानंतर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. या दरम्यान, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी न्यायालयाचे आभार मानले. यावेळी, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित म्हणाले की, 'माझी संस्था ही भारतीय आर्मी आहे. मला जी शिक्षा या 17 वर्षांत मिळाली, ती मी भोगली. जामिनावर बाहेर येऊनही मला बरंच काही सहन कराव लागलं. जे काही घडलं ते वाईट होतं. तपास यंत्रणा चुकीची नसते, पण तपासयंत्रणेत काम करणारे काही अधिकारी चुकीचे असतात. आम्ही त्यांचे शिकार झालो. अधिकारांचा गैरवापर करून आम्हाला शिक्षा देण्यात आली. सामान्य माणसाला असा त्रास पुन्हा कधी सहन करायला लागू नये. मी आभारी आहे, कोर्टाला धन्यवाद देतो'.