Thursday, August 21, 2025 04:55:13 AM

Sanjay Raut: महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होणार; संजय राऊतांचा दावा

मुंबईत दोन मोठ्या नेत्यांची रविवारी गुप्त भेट झाली. त्यानंतर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या एक्स पोस्टने राज्यात खळबळ उडाली आहे.

sanjay raut महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होणार संजय राऊतांचा दावा

मुंबई: सध्या, राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. एकीकडे, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रविवारी विधीमंडळात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर दुसरीकडे, मुंबईत दोन मोठ्या नेत्यांची रविवारी गुप्त भेट झाली. त्यानंतर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या एक्स पोस्टने राज्यात खळबळ उडाली आहे. सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने संजय राऊत दिल्लीला गेले होते. या दरम्यान, रविवारी रात्री राऊतांनी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी 'महाराष्ट्रात लवकरच वेगवान घडामोडी सुरु होतील', असं भाकीत वर्तवलं आहे.

हेही वाचा: Today's Horoscope: जुन्या अडचणी मिटणार; 'या' राशींना मिळणार यशाची गॅरंटी

संजय राऊतांची 'एक्स' पोस्ट

'फडणवीस मंत्रिमंडळात रम रमी रमा रमणी! मी दिल्लीत आहे; चार मंत्री नक्की घरी जात आहेत; पाचवा गटांगळ्या खात आहे. मिंधे, अजित दादांचे मुख्य नेते अमित शहा यांनी निर्णय घेतला! महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील', असं पोस्ट करून त्यांनी राज्यातील राजकारणात एक वेगळाच ट्विस्ट निर्माण केला आहे. तसेच, राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे. 

देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा


संजय राऊत यांच्या 'एक्स' पोस्टचा काय अर्थ निघतो? याचा अंदाज लावणं सध्या कठीण आहे. पण नुकताच राज्याच्या राजकारणात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. एकीकडे, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली होती. यावर, उद्धव ठाकरेंनी खेळीमेळीने 'विधान परिषदेचं कामकाज सुरु होतं', अशी प्रतिक्रिया दिली होती. तर दुसरीकडे, शनिवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे हॉटेल सोफिटेल येथे दाखल झाले होते. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तब्बल अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर, शनिवारी रात्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची देखील त्याच हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. विशेष बाब म्हणजे, या चर्चेनंतर, संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी पोस्ट शेअर केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री