सातारा: सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 20 ऑगस्टपर्यंत पर्यटनावर बंदी घातली आहे. जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात साताऱ्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट देतात. त्यामुळे स्थानिक व्यवसायांना चांगले उत्पन्न मिळते. हॉटेल, गेस्ट हाऊस, खाद्यपदार्थ विक्रेते, स्थानिक वाहन चालक, गाईड यांच्यासाठी पावसाळा म्हणजे कमाईचा हंगाम असतो. पण बंदीमुळे हे उत्पन्न बंद झाल्याने अनेकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Pandharpur Wari Palkhi 2025: तुम्हाला पूजाविधींबाबत 'या' महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत का? जाणून घ्या योग्य विधी आणि पालखीचे वेळापत्रक
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.
दिनांक 20 जून ते 20 ऑगस्ट 2025 पर्यंत खालील पर्यटनस्थळांवर बंदी लागू करण्यात आली आहे:
अजिंक्यतारा किल्ला
ठोसेघर धबधबा
केळवली-सांडवली धबधबा
वजराई धबधबा
कास पुष्प पठार
एकीव धबधबा
कास तलाव
बामणोली
पंचकुंड धबधबा
हेही वाचा: Today's Horoscope: तुमचं ग्रहमान काय सांगतं? जाणून घ्या आजचं राशीफल
सडावाघापूर उलटा धबधबा
ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा
रुद्रेश्वर देवालय धबधबा
ओझर्डे धबधबा
घाटमाथा धबधबा
लिंगमळा धबधबा
महाबळेश्वर
पाचगणी
विविध धरणे
हेही वाचा: Ashadhi Wari 2025: पंढरपूर वारीचं गुपित काय? शेकडो मैल चालणाऱ्या लाखोंच्या श्रद्धेमागचा इतिहास जाणून घ्या
कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना या आदेशाचे उल्लंघन करील, तर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.