Wednesday, August 20, 2025 08:51:14 PM

नागपुरात धक्कादायक प्रकार; चॉकलेटचं आमिष दाखवत चिमुकलीचा विनयभंग

नागपूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चिमुकल्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला तहसील पोलिसांनी अटक केली आहे.

नागपुरात धक्कादायक प्रकार चॉकलेटचं आमिष दाखवत चिमुकलीचा विनयभंग

तेजस मोहातुरे. प्रतिनिधी. नागपूर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच, नागपूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चिमुकल्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला तहसील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव शेरू उर्फ सुरेश टाकळीकर आहे. ही घटना नागपूरमधील टिमकी परिसरात घडली होती.

हेही वाचा: जलवाहिनीच्या कामासाठी दक्षिण मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद

नेमकं प्रकरण काय?

टिमकी परिसरातील पाच वर्षाच्या मुलीला एकटे पाहून आरोपी शेरूने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला कडेवर घेतले. त्यानंतर तो तिला रेल्वे रुळाकडे घेऊन गेला. तेथे त्याने मुलीबरोबर अश्लील चाळे केले. सायंकाळी, आई कामावरून घरी परतली तेव्हा मुलीने हा प्रकार तिला सांगितला. त्यानंतर महिलेने या घटनेची माहिती वस्तीतील लोकांना दिली. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि शेरूला अटक केली. नागरिकांनी शेरूवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

​​​​​​​हेही वाचा: नाशिकच्या इंदिरानगर बोगदा परिसरात महिलेला आणि तरुणाला बेदम मारहाण


सम्बन्धित सामग्री