सोलापुर: सोलापुरात तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. एकाच घरात गळफास घेत दोघांनी जीवन संपवलं आहे. नातेवाईकांचा शासकीय रुग्णालयात आक्रोश पाहायला मिळत आहे.
एकाच घरात गुरुवारी सायंकाळी तरुण-तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रोहित भिमू ठणकेदार असे तरुणाचे तर अश्विनी विरेश केशापुरे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. आम्ही जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहोत, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, आम्ही दोघे भाऊ बहीण,असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.
हेही वाचा: शेतीच्या वादातून बाईने ट्रॅक्टर चालकाला धू धू धुतले
सोलापुर शहरातील कर्णिक नगर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत एकाच घरात गुरुवारी सायंकाळी तरुण आणि तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रोहित भिमू ठणकेदार असे तरुणाचे नाव आहे. तर अश्विनी विरेश केशापुरे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. आत्महत्या केलेल्या तरुण आणि तरुणीची वय 23 होते. प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. आम्ही जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहोत, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, आम्ही दोघे भाऊ बहीण,असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला.
कर्णिक नगर परिसरातील एका बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर दोघेही एकाच दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. परंतु या दोघांनी टोकाचा पाऊल का उचलले, त्यांच्यातील नाते काय होते, याबाबत अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी करत आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.