Sunday, August 31, 2025 05:28:36 PM

Maharashtra Weather :महाराष्ट्रात उष्णतेचा चढला पारा, 24 तासांत तापमान वाढणार; काय काळजी घ्याल?

राज्यात तापमानाच्या वाढीचा गंभीर परिणाम, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा

maharashtra weather महाराष्ट्रात उष्णतेचा चढला पारा 24 तासांत तापमान वाढणार काय काळजी घ्याल
Heatwave Grips Maharashtra; Farmers Urged to Take Precautions

मुंबई : राज्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील सर्व मुख्य शहरांमधलं कमाल तापमान सध्या 35 अंश सेल्सिअसच्या वर गेलेलं आहे. त्यामुळे सर्वत्र उकाडा जाणवायला लागला आहे. काही शहरांमध्ये पहाटे आणि संध्याकाळी थंडी असल्याची अनुभूती येत असली तरी उर्वरित ठिकाणी उन्हाची तीव्रता वाढली आहे.

फेब्रुवारी महिना उलटताच उन्हाची चाहुल लागली असून, हवामानात लक्षणीय बदल होत आहेत. राज्यातून थंडी गायब झाली असली तरी, काही जिल्ह्यांमध्ये पहाटे गारठा जाणवतो. उर्वरित जिल्ह्यात मात्र उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. मुंबई, कोकण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे.

IMD (India Meteorological Department) ने दिलेल्या माहितीप्रमाणे, मुंबईत तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, राज्यातील सर्वाधिक तापमान सोलापूरमध्ये 37.4 अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यातील निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानातील फरक 10 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. आगामी २४ तासांत तापमान आणखी वाढणार असून, उष्म्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न जाण्याचा सल्ला दिला जात आहे.

पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतात पावसाची शक्यता आहे. राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

सोमवारी उष्णतेचा अधिक पारा
सोलापूर 37.4
ब्रह्मपुरी 37.2
अकोला 36.7
जेऊर 36.5
परभणी 36.5
नागपूर 36.5
चंद्रपूर 36.4
सांगली 36.3
वर्धा 36.0

शेतकऱ्यांनी फुल पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावं. आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावं. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. रेशीम उद्योजकांना त्यांच्या अळ्या कोष न करणे किंवा पोचट कोष होण्याच्या समस्यांवर ध्यान द्यावं. कापूस, ऊस, सोयाबीन आणि भाजीपाला शेतकऱ्यांना तुती लागवडीकडे वळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री