Sunday, August 31, 2025 08:15:55 AM

Weather Alert : रविवारी पुन्हा बसरणार! राज्यातल्या या 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट

रायगड, पुणे आणि पुण्याचा घाट परिसर, सातारा आणि कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

weather alert  रविवारी पुन्हा बसरणार राज्यातल्या या 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे : मागील दोन-तीन दिवस कमी झालेला पाऊस पुन्हा बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यातही परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जाणून घेऊ, 24 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.

रायगड, पुणे आणि पुण्याचा घाट परिसर, सातारा आणि कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात 24 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.

पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर यलो अलर्टवर
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश राहील आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढे असेल. 24 ऑगस्टसाठी पुण्याला आणि रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असेल. याशिवाय, सातारा आणि कोल्हापूरलाही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा - Dams in Nashik District Overflowed: नाशिक जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली; रेड-ऑरेंज अलर्टसह अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

मराठवाड्यात तीन जिल्ह्यांना अलर्ट
मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही
उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

विदर्भातील वातावरण ढगाळ, पावसाचा इशारा नाही
विदर्भातील कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाने 24 ऑगस्टसाठी कोणताही इशारा दिलेला नाही. नागपूरमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून ते 33 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल. वातावरण ढगाळ राहणार असून हलक्या पावसाची देखील शक्यता आहे.

हेही वाचा - Vasai Streets Turn White: वसईतील रस्त्यावर आला दुधाचा पूर! काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या


सम्बन्धित सामग्री