बीड : धाराशिवमधील आशिष विशाळ आपलाच कार्यकर्ता असल्याची कबुली आमदार सुरेश धस यांनी दिल्याचे पत्र व्हायरल होत आहे. यावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्र आणि लेटर पॅड माझं नाही असं आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.
धाराशिवमधील आशिष विशाळ आपलाच कार्यकर्ता असल्याची कबुली भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्राच्या माध्यमातून व्हायरल होत होती. यावर सुरेश धस यांनी स्पष्टीकरण देत आरोप फेटाळले आहेत. तो विषय मागे संपला आहे. मात्र त्या ठिकाणच्या पत्रकाराची आणि इतरांची वादावादी झाली आणि त्यामध्ये मलाही विनाकारण ओढले. यात माझा काही संबंध नाही. जे पत्र फिरवण्यात आले आणि जो लेटर पॅड दाखवला गेला. ते लेटर पॅड माझा नसल्याचं आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : देशमुखांचा खटला चालविणाऱ्या न्यायाधीशांबाबत दमानियांनी केला खळबळजनक दावा
पत्र आणि लेटर पॅडचं प्रकरण काय?
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभर मोर्चे काढण्यात आले. यावेळी आशिष विशाळ हे नाव चर्चेत आलं होतं. देशमुख कुटुंबियांना मदत करण्याचे सांगत आशिष विशाळ याने अधिकाऱ्यांकडून पैसे उकळल्याच्या आरोपावरून मराठा आंदोलकांनी त्याला बेदम चोप दिला होता. त्याच्यावर धाराशिव शहरात खंडणी उकळल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी माझ्याशी याचा काहीही संबंध नाही, त्याला तुडवा असे आमदार धस यांनी सांगितले होते. दरम्यान आता व्हायरस होणाऱ्या पत्र आणि लेटर पॅड माझं नसल्याचे देखील आमदार धस यांनी सांगितले आहे.