बीड : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी दिवसेंदिवस एकेक गोष्ट समोर येत आहेत. भाजपा आमदार सुरेश धस यांनी देशमुख हत्या प्रकरणात एक एक खुलासे समोर आणले आहेत. धस यांनी शनिवारी देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. बीड हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार असल्याचे आमदार धस यांनी सांगितले आहे. दरम्यान प्रकरणात पोलीस अधिकारी महाजन यांना सस्पेंड करा असेही धस यांनी म्हटले आहे.
मसाजोग ग्रामस्थांनी माझ्यावर हातवर करून विश्वास दाखवला आहे. या प्रकरणातील महाजन आणि पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे. आरोपींचे फोन कॉल कुणाला झाले. याचा तपास करण्यासाठी सायबर सेलमधील दोन तज्ञांची एसआयटीमध्ये नियुक्ती व्हावी, अशा मागण्या आमदार सुरेश धस यांनी केल्या आहेत. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालणार असून ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांची चौकशी पोलिसांनी करावी असं धस यांनी सांगितलं. धस यांनी शनिवारी देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
हेही वाचा : राज ठाकरेंच्या भेटीला उदय सामंत; ठाकरेंच्या घरी खलबतं, नेमकी काय झाली चर्चा?
सुरेश धस यांच्या मागण्या
आरोपींचे 2 महिन्यांपूर्वीचे सीडीआर तपासा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. महाजन आणि पाटील या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. तसेच कृष्णा आंधळेला अटक होणं गरजेचं आहे. रमेश घुले, दत्ता बिक्कड, दिलीप गीते,गोरख फड यांचे सीडीआर तपासून सहआरोपी करा. अशीही मागणी त्यांनी केली आहे. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा. नितीन बिक्कड आरोपी कसा होत नाही? आरोपींना फरार करण्यात बिक्कड यांचा वाटा असल्याचेही धस म्हणाले आहेत.
चार्जशीट दाखल करण्यापूर्वी ग्रामस्थांनी 8 मागण्या मांडल्या. या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याचे धस यांनी म्हटले. आरोपींना मदत करणाऱ्या जेल प्रशासनातील लोकांना निलंबित करावं. पंकज कुमावत यांची ॲडिशनल एसपी म्हणून नियुक्ती करावी. देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा अशीही मागणी धस यांनी केली.