Sunday, August 31, 2025 06:06:30 AM

सेक्सटॉर्शनमुळे अलिबागमधील शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल! अटल सेतूवरून उडी मारून केली आत्महत्या

अलिबागमधील कुरुड गावातील वैभव पिंगळे, असे मृत शिक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, वैभ पिंगळे आपल्या चारचाकी गाडीने प्रवास करत अटल सेतूवर आले.

सेक्सटॉर्शनमुळे अलिबागमधील शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल अटल सेतूवरून उडी मारून केली आत्महत्या
Atal Setu
प्रतिकात्मक प्रतिमा

नवी मुंबईतून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 50 वर्षीय प्राथमिक शाळेतील शिक्षकाने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. अलिबागमधील कुरुड गावातील वैभव पिंगळे, असे मृत शिक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, वैभ पिंगळे आपल्या चारचाकी गाडीने प्रवास करत अटल सेतूवर आले. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले की, त्यांनी पुलाच्या कडेला गाडी पार्क केली. ते  खाली उतरले आणि लगेचच त्यांनी उडी मारून आत्महत्या केली. 

हेही वाचा - लष्करात नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखोंची फसवणूक

त्याच्या कुटुंबीयांनी उलवे पोलिसांना सांगितले की, ते सेक्सटॉर्शनचा बळी ठरले होते. शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वैभन पिंगळे यांचा मृतदेह अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान, पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. अखेर पिंगळे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याची चौकशी सध्या पोलिस करत आहेत. 

हेही वाचा - यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या बनावट फेसबुक अकाऊंटमुळे खळबळ

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन राजणे यांनी सांगितले की, पिंगळे सकाळी 7.30 वाजता त्याच्या कुटुंबियांना ते बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. ते त्यांचा फोन घरीचं ठेवून चिरनेर मार्गे अटल सेतू पुलावर गेले. सुमारे 9 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर, त्यांनी कार पुलाच्या कडेला पार्क केली आणि लगेचच समुद्रात उडी मारली. 

अटल सेतू पुलावरून आत्महत्येची ही या वर्षातील पहिलीच घटना आहे. गेल्या वर्षी एका व्यावसायीकाने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 
 


सम्बन्धित सामग्री