नागपूर : नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे.
नागपूर शिक्षण विभागामधील शिक्षक भरती घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. हा घोटाळा नागपूर विभागापुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्रभर याची चर्चा आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे. या संदर्भात येत्या विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी आणि तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून लावून धरण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रति बिहार झाला की काय असं वाटायला लागलं आहे.
हेही वाचा : हगवणे पिता-पुत्रांना आसरा देणाऱ्या 5 जणांना अटक
महाराष्ट्रातील हा घोटाळा मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा झाला असल्याचं चित्र पाहायला मिळते. शासनाच्या निर्णयाने शिक्षक भरती बंद केली होती. महसूल खात्याने चौकशी केली होती. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पूर्ण करण्याचा आदेश सरकारने काढला मात्र त्यानंतर संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांनी मिळून 2013 च्या आधीच्या अपॉइंटमेंट केल्या. मयत झालेल्या सोमेश्वर नेताम नावाच्या शिक्षण अधिकाऱ्याच्या नावाने तो मयत झाल्यानंतर सुद्धा त्याच्या स्वाक्षरीने बोगस डॉक्युमेंट तयार करून अनेक बोगस अपॉइंटमेंट केल्या आहेत. त्याचे शालार्थ आयडी 2019 नंतर रिलीज करत असताना त्यापूर्वी सुद्धा काही रिलीज करण्यात आले. आता जे शालार्थ आयडी संदर्भात शोध घेतला जात आहे आणि आतापर्यंत अटकेत असलेले किंवा बेल झालेले जे अधिकारी आहेत त्यांनी सायबरमध्ये या संदर्भात तक्रार सुद्धा केली होती. त्यामध्ये वेतन पथक अधिकारी सुद्धा निलंबित झाला होता. हा घोटाळा आता बाहेर यायला लागला आहे. डेप्युटी डायरेक्टर लेव्हलच्या चार अधिकाऱ्यांना या प्रकरणात अटक केली आहे. तर इतर पंधरा लोकांना सुद्धा अटक करण्यात आली आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी आहे की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जात आहे. चौकशी पुढे जाताना त्यांना दिसते. मात्र हा घोटाळा फक्त नागपूर विभागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात बोगस नियुक्त्या झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच या संदर्भात चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी होत आहे. या प्रकरणावर संपूर्ण महाराष्ट्रात आता एसआयटी मार्फत चौकशी करून हे प्रकरण पूर्णपणे उकळून काढलं पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे. त्यात किती अर्थकारण झालं आहे, कोणाचं अर्थकारण झाल आहे हे पुढे येईल आणि त्यातून या स्कॅनडलमध्ये असलेले अधिकारी आणि संस्थाचालक सुद्धा पुढे येतील.