विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: धाब्यावरून जेवण करून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना भरधाव कार रस्त्यावरील पुलाच्या दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात एवढा भीषण होतं की चार चाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.ही घटना छत्रपती संभाजीनगर- जळगाव राष्ट्रीय महामार्गाने बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सय्यद फारूक सय्यद माजेद (वय 18) रा. मोतीलाल नगर, अरफात बागवान (वय 20) रा. मोतीलाल नगर, रेहान सय्यद रा. मोतीलाल नगर अशी अपघातात मृतांची नाव आहे. याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर शहरातील पाच जण फुलंब्री रस्त्यावरील ढाब्यावर एम.एच 20 इ.जे.1586 या कारने जेवण करण्यासाठी केले. जेवण झाल्यानंतर फुलंब्री येथून छत्रपती संभाजीनगरकडे छत्रपती संभाजीनगर - जळगाव राष्ट्रीय महामार्गाने येत होते. भरधाव येत असलेली चार चाकी बिल्डा फाट्याजवळ आली. यावेळी कारचालकाला रस्त्यावरील पुलाचा अंदाज न आल्याने कार थेट पुलाच्या दुभाजकाला धडकले. हा अपघात एवढा भीषण होतं की कार उलटली.
हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी दाम्पत्याने एक एकर शेतीमधून मिळवलं 5 लाखांचं उत्पन्न
या भीषण अपघातात अरफात बागवान, रेहान सय्यद, सय्यद मारूफ यांचा जागीच मृत्यू झाला. तर सय्यद उजेफ, शेख शारीक हे गंभीर जखमी झाले. दरम्यान या भीषण अपघाताची माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांना मिळाली. पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे घाटी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. मृताच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयामध्ये टाहो फोडला.