राज्याचे कृषीमंत्री पद दत्तात्रय भरणे यांना मिळाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी सकाळी सात वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. यावेळी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे. राज्याचे कृषीमंत्री पद दत्तात्रय भरणे यांना मिळाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी सकाळी सात वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. अनेक जणांनी तुळशीचा हार, काहींनी उसाची मोळी देऊन नवीन झालेले कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. माझं संपूर्ण भाषण ऐकलं तर त्यामध्ये आपणास मी जे वक्तव्य केलं आहे. त्याचा संदर्भ घेता येईल माझं बोललेलं वक्तव्य कट करून दाखवलं आहे असे नवनियुक्त कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.
कृषीमंत्री पदी नियुक्ती झाल्यावर काही अधिकारी कामे सरळ मार्गाने करतात. तर काहीवेळी वाकडी कामं सुद्ध सरळ करतात असे वक्तव्य दत्ता भरणे यांनी केलं होतं. यानंतर त्यांच्यावर टीका झाली. यावर भरणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.