महाराष्ट्र हे भारतातील असे राज्य आहे जे आपल्या विविध संस्कृती आणि परंपरेसाठी विशेष ओळखला जातो. पूर्वेतील गोंदिया ते पश्चिमेतील कोंकण, उत्तरेतील नंदुरबार ते दक्षिणेतील कोल्हापूर यासारख्या विविध शहरात आपल्याला येथील नवनवीन मेजवानी पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात अनेक खाद्य पदार्थ बनवल्या जातात. जसं की कोल्हापुरातील प्रसिद्ध कोल्हापुरी मिसळ आणि तांबडा - पांढरा रस्सा, मुंबईतील वडापाव, साताऱ्यातील कंदी पेढे, लोणावळ्याची चिक्की असे अनेक खाद्य पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अनेक खवय्ये विविध भागातून महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ खाण्यासाठी येतात. जर तुम्हाला देखील खाद्यपदार्थांविषयी आवड असेल तर जाणून घ्या कोण-कोणते खाद्यपदार्थ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.
हेही वाचा: Tea making tips : परफेक्ट चहा बनवायचा आहे? मग आधी दूध टाकायचं की पाणी, जाणून घ्या योग्य पद्धत!
1 - पावभाजी:
पावभाजी हा पदार्थ केवळ महाराष्ट्रात प्रसिद्ध नसून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. पावभाजी हे बटाटे, ढबू मिरची, यासारख्या अनेक भाज्यांपासून बनवले जाते. पावभाजी महाराष्ट्रातील लोकप्रिय स्ट्रीट फूड असून अनेक खवय्ये खास पावभाजी खाण्यासाठी महाराष्ट्रात येतात. भारताबरोबरच जगभरातील खवय्येदेखील पावभाजी खाण्यास येतात.
2 - वडापाव:
वडापाव हे मुंबईतील प्रसिद्ध खाद्यपदार्थ असून अनेक खवय्यांना वडापाव प्रचंड आवडतो. वडापाव खाण्यासाठी अनेक पर्यटक खास परराज्यातून महाराष्ट्रात येतात. याची तिखट-गोड चव अनेक खवय्यांना आकर्षित करते. असे म्हणतात, की अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी या वडापावला खाऊन एक एक दिवस काढलेत. त्यामुळे अनेकांसाठी वडापाव खूप खास आहे.
हेही वाचा: International Women's Day: भारताच्या इतिहासाला आकार देणाऱ्या महाराष्ट्रातील कणखर महिला
3 - उकडीचे मोदक:
गणेशोत्सवच्या दरम्यान महाराष्ट्रातील घरा-घरात उकडीचे पदार्थ बनवल्या जातात. उकडीचे मोदक लोकप्रिय गोड खाद्य असून याला तांदळाच्या पिठाने आणि नारळाच्या मिश्रणाने बनवले जाते. उकडीचे मोदक अनेक खवय्यांचे आवडीचे पदार्थ आहे, ज्यामुळे जगभरातून अनेक खवय्ये उकडीचे मोदक खाण्यासाठी महाराष्ट्रात येतात.
4 - झुणका भाकरी:
झुणका भाकरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. बेसन आणि डाळीच्या पिठापासून ही भाजी बनवली जाते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. अनेक खवय्यांचे झुणका भाकरी आवडीचे पदार्थ असल्यामुळे अनेकजण विविध ठिकाणातून झुणका भाकरी खाण्यासाठी खास महाराष्ट्रातील गावात येतात. झुणका भाकरीला ठेचा (खरडा) आणि कांद्यासोबत खातात.