पुणे : पुण्यातील स्वारगेट स्थानकात सात वर्षांपासून भंगारात काढलेल्या (स्क्रॅप) बस अखेर एसटी प्रशासनाने हटविल्या आहेत. क्रेनच्या साहाय्याने या बस हटविण्यात आल्या असून लवकरच त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे. यामुळे स्वारगेट बस स्थानकातील गुन्हेगारांचा 'अड्डा' काही काळासाठी तरी उध्वस्त झाला. मात्र त्यांचा वावर रोखणे हे एसटी प्रशासनासमोर आव्हान असणार आहे. या ठिकाणी असणाऱ्या बसेसची अवस्था जय महाराष्ट्राने सगळ्यात पहिल्यांदा दाखवली होती आता पूर्णतः ही जागा मोकळी करण्यात आली असून सर्व बसेस बाजूला काढण्यात आलेल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
महाशिवरात्री दिवशी पुण्यात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. आरोपी गाडेने तरुणीवर अत्याचार करुन थेट गाव गाठले. पुणे पोलिस दोन दिवस आरोपीच्या शोधात होते आणि रात्री 1 वाजता गाडेला त्यांनी अटक केली. यावेळी आरोपी गाडे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. एकदा नाहीतर तीन वेळेस त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कीटकनाशक पिण्याचा आणि गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. आरोपीला कोर्टात नेताना जनतेचा संताप असल्याने सगळ्या शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत.
हेही वाचा : वाल्मिक कराड हाच हत्येचा सूत्रधार; पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात स्पष्ट उल्लेख
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील एका गावातून आरोपीला अटक केली. रात्री 1 वाजता आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपी गुनाट गावच्या शिवारात लपून बसला होता. ज्या शेतात आरोपीला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरू होतं तिथं तो सापडलाच नाही. दत्तात्रय गाडे रात्री नातेवाईक महेश बहीरट यांच्या घरी 10.30 वाजता आला होता. दत्तात्रय गाडेनं नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली. माझी मोठी चूक झाली, मला सरेंडर करायचं असं सांगून तिथून निघून गेला. नातेवाईकांनी आरोपी दत्तात्रय गाडे आल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घराच्या परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला. पोलिसांना आरोपीचा बदलेला शर्ट सापडला, त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला. डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला. मात्र आरोपी ज्या ठिकाणावरुन आला होता तिथे परतलाच नाही.आरोपी नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॅालमध्ये झोपू राहिला. शेतातील कॅनॉलच्या बाजूला झोपलेला असताना आरोपीला अटक केली. तब्बल 75 तासांनी आरोपीला बेड्या ठोकण्यात पुणे पोलिसांना यश मिळाले. दरम्यान आता या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ही कोठडी सुनावण्यात आली आहे.