Nagpur Tragedy: नागपूर जिल्ह्यात बुधवारी दुपारी झालेल्या पावसादरम्यान वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा गावात घडली. मृतांमध्ये वंदना प्रकाश पाटील (37), तिचा मुलगा ओमप्रकाश पाटील (18) आणि 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे तिघेही शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी तपास करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
हेही वाचा - Nagpur-Gondia Expressway: नागपूर-गोंदिया एक्सप्रेसवे प्रकल्पाला हिरवा कंदील; 3 तासांचा प्रवास फक्त 75 मिनिटांत पूर्ण होणार
गावावर पसरली शोककळा
गणेश चतुर्थीच्या दिवशी झालेल्या या दुर्घटनेमुळे धापेवाडा गावात शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. बावनकुळे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे वीज पडून एक आई, तिचा मुलगा आणि शेतमजुराचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेत जीव गमावलेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती!'
हेही वाचा - Azad Maidan वर आंदोलनाला परवानगी मिळाली! पण, मनोज जरांगे आक्रमक, म्हणाले आता एका दिवसातच...
सलग दोन दिवस दुर्घटना -
यापूर्वी, मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे परिसरातही अशीच दुर्घटना घडली होती. रितेश मोरेश्वर सरोदे (28) आणि राजू ताराचंद सरोदे (16) हे दोन भाऊ शेतात काम करत होते. यावेळी वीज कोसळून या दोघांचा मृत्यू झाला. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.