Mumbai Police Busts Huge Racket: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आरोपींनी बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून 7.30 कोटी रुपयांच्या प्रीमियम कार खरेदी केल्या होत्या. आरोपींनी प्रथम राज्याबाहेरील व्यापाऱ्यांचे जीएसटी क्रमांक वापरले. यानंतर, त्यांनी बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवले आणि त्या व्यापाऱ्यांचे CIBIL स्कोअर तपासले.
बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले बँकेकडून कर्ज -
आरोपींनी चांगला CIBIL स्कोअर असलेल्या व्यापाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे वापरून बँकांकडून कर्जे मिळवली. कर्ज मिळाल्यानंतर त्या पैशाच्या गाड्या खरेदी केल्या जात होत्या आणि नंतर इंजिन नंबर आणि चेसिस नंबर बदलून या गाड्या इतर राज्यात विकल्या जात होत्या. ही टोळी दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशातील रहिवाशांना त्या राज्यांमधील एजंटांमार्फत गाड्या विकत होती.
हेही वाचा - हनीमूनला गेलेल्या नवविवाहितेला पतीकडून मारहाण; जीव वाचवून गोव्याहून एकटीच परतली, गुन्हा दाखल
16 वाहने जप्त
या टोळीने बँका, व्यावसायिक आणि गाड्या खरेदी करणाऱ्या लोकांची फसवणूक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीतील काही आरोपी कार चोरीच्या प्रकरणांमध्येही सक्रिय असल्याचा संशय आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात 16 वाहने जप्त केली आहेत, ज्यात एक बीएमडब्ल्यू ओपन टॉप कन्व्हर्टिबल, 8 फॉर्च्युनर एसयूव्ही आणि इतर महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - प्राण्यांची तस्करी करणाऱ्या तिघांना दिल्ली विमानतळावरुन अटक
या गाड्यांची संख्या 35 पर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आरोपींपैकी 7 जणांना अटक करण्यात आली आहे, त्यापैकी 4 जणांचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये तीन जण मुंबई आणि उपनगरातील आहेत, तर काही गुजरात आणि मध्य प्रदेशातील आहेत तर काही दिल्लीतील आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सामील आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.