Sunday, September 14, 2025 01:26:29 AM

कोर्टात महिलांनी केला अक्कू यादववर 70 वेळा चाकूने वार;2004 मधील सत्य घटना

2004 मध्ये, शेकडो महिलांनी कोर्टरूममध्ये घुसून एका सिरीयल नराधमाला भयानक शिक्षा सुनावली, ज्यामुळे अशा गुन्हेगारांना किंवा गुन्हा करणाऱ्या व्यक्तींना चांगलाच धडा मिळाला.

कोर्टात महिलांनी केला अक्कू यादववर 70 वेळा चाकूने वार2004 मधील सत्य घटना

2004 मध्ये, शेकडो महिलांनी कोर्टरूममध्ये घुसून एका सिरीयल नराधमाला भयानक शिक्षा सुनावली, ज्यामुळे अशा गुन्हेगारांना किंवा गुन्हा करणाऱ्या व्यक्तींना चांगलाच धडा मिळाला. या धक्कादायक घटनेने देशभरात मानवतेवर मोठा परिणाम झाला आणि असंख्य महिलांना घराबाहेर पडताना भीती निर्माण होत असे. ज्या जल्लादाला त्या महिलांनी मृत्युदंड दिला त्याचे नाव अक्कू यादव होते. त्या नराधमाला बेदम मारल्यानंतर, महिलांनी न्यायालयातील न्यायाधीशांना सांगितले, 'आता तुम्ही आम्हाला योग्य वाटेल तशी शिक्षा देऊ शकता'.

 

कोण होता अक्कू यादव?

अक्कू यादवला, भरत कालीचरण म्हणूनही ओळखले जात होते. अक्कू यादव महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कस्तुरबा नगरचा रहिवासी होता. अक्कू यादव लहानाचा मोठा झोपडपट्टीमध्ये वाढला. सुरुवातीला अक्कू यादव छोटे-मोठे गुन्हे करत होता आणि शेवटी तो एक कुख्यात गुंड बनला. त्याच्या नावाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. इतकंच नाही, तर त्याने 300 कुटुंबांमध्ये स्वतःची एक वेगळीच दहशत निर्माण केली होती. अक्कू यादव त्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवले होते. अक्कू यादव आणि त्याच्या टोळ्यांनी पुरुष, महिला आणि मुलांवर अत्याचार करायचे, छळ, मारहाण आणि मग त्यांच्या शरीराचे बारीक तुकडे करायचे. एवढंच नाही, तर अक्कू यादव आणि त्याची टोळी महिलांवर बलात्कार करायचे आणि नंतर त्यांना मृत्यूच्या दारी पाठवायचे. हा प्रकार अक्कू यादव सातत्याने करू लागला.

 

अशी होती अक्कू यादवची दहशत:

अक्कू यादव हा साधारण माणूस नसून अत्यंत प्रभावी माणूस होता. बेकायदेशीर मार्गाने अक्कू यादवने बरीच संपत्ती मिळवली होती. तो सार्वजनिकरित्या महिलांवर सामूहिक अत्याचार करत असे. सामूहिक अत्याचार करताना तो लहान, तरुण किंवा वयस्कर म्हणून काहीही पाहत नसे. तो दररोज एका महिलेची मागणी करत असे. तो एक मनोरुग्ण आणि सिरीयल अत्याचारी होता. इतकंच नाही, तर त्याने 10 वर्षांखालील मुलींवरही अत्याचार केला होता.

 

अक्कूची चूक त्याला महागात पडली:

ऑगस्ट 2004 मध्ये, अक्कूने एका तरुणीवर बलात्कार केला आणि तिच्याकडून पैसे मागितले. पीडित मुलगी 25 वर्षांची होती. जेव्हा तिने अक्कूची तक्रार पोलिसांकडे केली, तेव्हा तो त्याच्या 40 गुंडांसह तिच्या घरी आला आणि तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. त्याने तिला इशारा देत म्हटले,'जर आपण पुन्हा कधी भेटलो तर आपण अशी कामे करू ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही'. या घटनेनंतर, तिने पोलिसांना फोन केला. पण नेहमीप्रमाणे पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही.

जेव्हा अक्कूला याची खबर मिळाली, तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या गुंडांसोबत तिच्या घरी गेला. त्याला पाहून पीडित तरुणी स्वयंपाकघराच्या दिशेने धाव घेतली, गॅस सिलेंडर उघडला आणि मग अक्कू आणि त्याच्या सर्व हल्लेखोरांना 'क्षणात उडवून देईल' अशी धमकी दिली. त्यामुळे ते सर्वजण घाबरून तिथून पळून गेले. त्यानंतर ती घाबरून घराबाहेर आली आणि शेजाऱ्यांना एकत्र करून अक्कू यादव आणि त्याच्या टोळीवर कठोर भूमिका घेण्यास सांगितले. तिच्या धाडसाने प्रेरित होऊन सर्व महिलांनी अक्कूला धडा शिकवण्याचे ठरवले.

 

200 महिलांनी केला न्यायालयात हल्ला:

यानंतर, शेकडो पुरुष आणि महिलांनी दगड आणि काठ्या उचलल्या आणि अक्कूच्या टोळीतील सदस्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यांनी अक्कूचे घर जाळून टाकले. अक्कूचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी अक्कूला ताब्यात घेतले. 13 ऑगस्ट रोजी अक्कू यादवला नागपूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात केले होते. जेव्हा महिलांना जाणवले की न्यायालय त्याला पुन्हा एकदा निर्दोष सोडतील, तेव्हा 200 महिलांनी अचानक न्यायालयात धाव घेतली आणि त्याच्यावर हल्ला केला. 

मात्र, कोर्टरूममध्ये अक्कू यादव धाडसी दिसण्याचा प्रयत्न करत त्या प्रत्येकाला धमकवण्यास चालू केले. इतकंच नाही, तर अक्कू यादवने ज्या महिलेसोबत गैरवर्तन केले होते, तिला भर न्यायालयात सर्वांसमोर वेश्या म्हटले. त्या महिलेने धाडसी पाऊल उचलून स्वतःची चप्पल काढली आणि त्याला न्यायालयात मारहाण करण्यास चालू केली आणि ओरडली, 'पुरे झाले! आपण दोघेही या पृथ्वीवर एकत्र राहू शकत नाही. एकतर तू जग, नाहीतर मी जगेन'. 

 

महिलांनी अक्कू यादवला मृत्यूच्या दारी पाठवले:

यानंतर, महिलांनी न्यायालयाचे गेट तोडले आणि मोठ्या संख्येने गर्दी केली. त्यानंतर, त्यांनी गार्ड आणि कोर्टाच्या अधिकाऱ्यांना बाजूला ढकलले. महिलांनी अक्कू यादवला पकडले आणि त्याच्या चेहऱ्यावर मिरची पावडर लावली. मग महिलांनी अक्कू यादवने तोंड लाल मिरच्या आणि दगडांनी भरले आणि स्वयंपाकघरातील चाकूने त्याचे गुप्तांग कापले. त्यानंतर सर्व महिला एकत्र येऊन त्याच्यावर 70 पेक्षा अधिक वार केले, ज्यामुळे अक्कू यादवचा जागीच मृत्यू झाला. अक्कू यादवच्या मृत्यूनंतर, पोलिसांनी सुमारे 100 लोकांना अटक केली आणि त्यापैकी 18 जणांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला.


महिलांनी व्यक्त केल्या त्यांच्या भावना:

महिलांना असे वाटले की या राक्षसाला शिक्षा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. कारण न्यायालय आणि पोलीस त्याला कोणतीही इजा करू शकत नाहीत. त्यापैकी एक महिला म्हणाली, 'आम्ही सर्व महिला गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे अत्याचार सहन केले. आम्ही पोलिसांची वाटदेखील पहिली. मात्र, पोलिसांनी काहीच केले नाही. अत्याचार आणि त्याची गुंडप्रवृत्ती नेहमीचे झाले होते. ज्या पीडितेने त्या नराधमाला आव्हान दिले होते, तिने उघड केले', ' पोलीस आणि राजकारणी त्याच्यासोबत एकमताने होते आणि त्याला संरक्षण देत होते. आम्हा गरिबांच्या हाकेला कोणीच आले नाही'. 


टोकाची भूमिका घेण्यामागील मुख्य कारण:

महिलांनी आग्रह धरला की त्यांनी ही टोकाची भूमिका त्या राक्षसापासून, स्वतःच्या आणि मुलींच्या रक्षणासाठी घेतले होते. 'न्यायालयांना निकाल देण्यासाठी आयुष्यभर वेळ लागतो. निर्णय होईपर्यंत गुन्हेगार आधीच मरण पावले तर मग निकालाचा काय अर्थ आहे? आम्ही न्यायालयांना 15 वर्षे दिली. इतकंच नाही तर तर आम्ही शांतपणे अत्याचार सहन केले', असे त्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे महिला म्हणाल्या, 'कस्तुरबा नगरने न्यायालयांना स्पष्ट संदेश दिला आहे की आम्ही ते केले जे तुम्ही करू शकला नाही. तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही कसे चुकीचे आहोत. गरिबांना न्याय मिळत नाही. जर एखाद्या मंत्र्याच्या पत्नी किंवा मुलीसोबत असे काही घडले असते तर? म्हणूनच आम्ही प्रकरण स्वतःच्या हातात घेण्याचा निर्णय घेतला'. 
 


सम्बन्धित सामग्री