सोलापूर: सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील माजी सरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याच्या तक्रारीनंतर पूजा गायकवाड या 21 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी पूजाच्या घराबाहेर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. गोविंद यांची कला केंद्रातील पूजासोबत ओळख झाली आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले. गोविंदचं पूजावर प्रेम असल्यामुळे त्यांनी तिला सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा मोबाईलही दिला होता.
हेही वाचा: Pune Crime : मोठ्या आवाजात पत्नीला हॉरर सिनेमाची कथा सांगणे पतीला पडले महागात! चित्रपटगृहात मारहाण; जाणून घ्या
दरम्यान पूजाने गोविंदकडे घर नावावर करण्यासाठी तगादा लावला होता, असा आरोप गोविंद बर्गे यांचे मेहुणे तक्रारदार लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी केला आहे. पूजा आणि गोविंद बर्गे यांचे दीड वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. पाच ते सहा दिवसापासून संपर्क होत नसल्यामुळे गोविंद बर्गे पूजेच्या घरासमोर आले होते आणि तिथेच त्यांनी गाडीत स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. गोविंद बर्गे विवाहित होते आणि त्यांना दोन मुलंही होती. एक मुलगी नववीत आणि एक मुलगा सहावीत शिकतोय. लक्ष्मण चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन नर्तकी पूजा गायकवाड हिला वैराग पोलिसांनी अटक केली आहे.