Monday, September 01, 2025 02:38:02 PM

हातात सिगारेट, बाजूला पैशांची बॅग, संजय शिरसाटांचा व्हिडीओ व्हायरल; राऊतांचे गंभीर आरोप

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत असा दावा राऊतांनी केला आहे.

हातात सिगारेट बाजूला पैशांची बॅग संजय शिरसाटांचा व्हिडीओ व्हायरल राऊतांचे गंभीर आरोप

मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत असा दावा राऊतांनी केला आहे. यासह राऊत यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की मंत्री संजय शिरसाट एका खोलीत बेडवर बसून फोनवर बोलत आहेत व सिगारेट ओढत आहेत. या व्हिडीओमध्ये शेजारी एक बॅग देखील दिसत आहे. या बॅगेत नोटांची बंडलं पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट यांचा श्वान देखील दिसत आहे. 

शिरसाट यांच्या बाजूला पैशांची बॅग दिसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आयकर विभागाच्या नोटीशीनंतर शिरसाटांचा हा व्हिडीओ माझ्याकडे आला आहे असंही राऊत यांनी सांगितले आहे. मंत्री संजय शिरसाट एका हॉटेलामधील खोलीत बेडवर बसले आहेत. आणि त्यांच्या बाजूला नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल खासदार राऊत यांनी केला आहे. 

हेही वाचा: गुरुपौर्णिमेनिमित्त अमित शाहांचे चरण धुवून एकनाथ शिंदेंनी आशिर्वाद घेतले; राऊतांनी साधला निशाणा

व्हिडीओवर शिरसाटांचे स्पष्टीकरण 
राऊतांना पैशांशिवाय काहीच दिसत नाही. व्हिडिओमध्ये दिसणारं माझं बेडरुम आहे. कपडे ठेवायच्या बॅगेत पैसे कोण ठेवतं? असा सवाल शिरसाट यांनी केला आहे. इतके पैसे असते तर आल्या आल्या कपाटात टाकले असते. संजय राऊत याने आजही ठरल्या प्रमाणे भुंकण्याचं काम केलं असे शिरसाट यांनी म्हटले आहे. अमित शाह याला भेटले. याला संताजी धनाजी दिसतात का असे स्टेटमेंट फक्त संजय राऊतला जमेल असेही त्यांनी म्हटले आहे. 

'इतकी मोठी पैशांची बॅग कपाटात ठेवली असती ना...'
संजय शिरसाट म्हणाले, "संजय राऊतसारखा वेडा माणूस त्याच्यासाठी आम्ही ठाण्याला बेड ठेवला आहे. या मूर्ख माणसासाठी वेल घालवू नका. व्हिडीओ काय दाखवत आहे. माझं घरं आहे, माझी खोली आहे.  मी बनयानवर आहे. बाजूला माझा कुत्रा तिथे आहे. याचा अर्थ होतो की मी प्रवासातून आलो आहे. इतकी मोठी पैशांची बॅग कपाटात ठेवली असती ना... यांना पैश्याशिवाय काहीही दिसत नाही. यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं यांचं वर्तन आहे. माझ्या बेडरूममध्ये प्रवासातून आलेली बॅग मी ठेवली आहे. अशा बातम्या करायला कसं सुचत." 

कोणी व्हिडीओ काढला तर त्यात काही गैर नाही. दुसऱ्या महिलांवर छळ करणारे आमच्या बॅग काय पाहत आहात. जाणूनबुजून आम्हाला टार्गेट केलं जातं आहे. मी उत्तर देऊ शकतो म्हणून ते मला बोलतात. प्रवासातून आलेली बॅग आहे. या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही. मला या व्हिडिओची कल्पना नाही. आधी आडवी बॅग नंतर उभी बॅग दाखवत आहेत असे शिरसाट यांनी म्हटले आहे. 


सम्बन्धित सामग्री