मुंबई: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचे नवे रहस्य उघडकीस आले आहे. कराड हा केवळ गुन्हेगारी जगतापुरता मर्यादित नसून त्याचे सिनेसृष्टीशीही खास कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर त्याचे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशनचे आयडी कार्ड व्हायरल होत असून, तो बी आर जे फिल्म प्रोडक्शनचा सभासद असल्याची चर्चा रंगली आहे.
फिल्म प्रोडक्शनमध्येही सक्रीय?
संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या विविध प्रकरणांची माहिती समोर येत असतानाच, आता त्याने चित्रपट निर्मिती क्षेत्रातही हात आजमावला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आयडी कार्डमुळे त्याच्या या नव्या ओळखीची पुष्टी झाली आहे. त्याचे हे कार्ड पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.संतोष देशमुख हत्याकांडी मुकळ्या आरोपी असलेल्या वालिम्रिक कराडच्या विविध प्रकरणांची माहिती समोर येत असतानाच, आता त्याने चित्रपट निर्मिती क्षेत्रातही हात आजमावला असल्याचे स्प्ष्ट होत आहे.
वाल्मिक कराड बी आर जे फिल्म प्रोडक्शनचा आजीवन सभासद असल्याचे सांगितले जात आहे. या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून तो फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत होता का? किंवा त्याने काही सिनेमे निर्माण केले आहेत का? याबाबत आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
वाल्मिक कराडच्या मुंबईतील बीकेसी परिसरातील ऑफिसचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. हे ऑफिस फिल्म प्रोडक्शनसाठीच वापरण्यात येत होते का? की त्याचा काही वेगळाच वापर होत होता? याचा तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी देखील काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
या संपूर्ण प्रकारामुळे सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीचा फिल्म इंडस्ट्रीशी संबंध असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चित्रपटसृष्टीतील काही लोकांच्या त्याच्याशी संबंध होते का? त्याने कोणा सोबत काम केले होते का? याचा तपास आता अधिकाधिक गडद होत चालला आहे.