Sunday, August 31, 2025 06:48:21 AM

Maharashtra Nashik: लाडक्या बहिणींकडून वसुली करणार; काय म्हणाले भुजबळ?

लाडकी बहीण योजनेसंदर्भात नेतेमंडळींकडून अनेक वक्तव्य केली जाताय. मंत्री भरत गोगवलेंच्या वक्तव्यानंतर आता छगन भुजबळांच वक्तव्य चांगलच चर्चेत आलाय.

maharashtra nashik लाडक्या बहिणींकडून वसुली करणार काय म्हणाले भुजबळ

महाराष्ट्र: लाडकी बहीण योजनेसंदर्भात नेतेमंडळींकडून अनेक वक्तव्य केली जाताय. मंत्री भरत गोगवलेंच्या वक्तव्यानंतर आता छगन भुजबळांच वक्तव्य चांगलच चर्चेत आलाय. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा झाला. त्यानंतर आता विविध नेतेमंडळी लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताय. यात आता छगन भुजबळांच वक्तव्य चर्चेचा विषय ठरतोय. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय म्हणाले छगन भुजबळ? 
'ज्या महिलांचे अर्ज नियमित नाही. त्यांनी स्वत:हून नावे काढून घ्यावे. अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसुली करावी, असं मोठं वक्तव्य केलं आहे.

त्याचबरोबर ' काही प्रमाणात हे खरं आहे. योजनेचे नियम काही वेगळे होते. त्यात एका घरात दोन महिलांना देता येत नाही. मोटार गाडी असेल तर त्यांना देता येणार नाही. गरीबांना त्याचा लाभ झाला पाहिजे, हा योजनेचा उद्देश आहे. जे नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपले नावे काढले पाहिजे. असंही छगन भुजबळ म्हणालेत. 

दरम्यान 'ज्या लाडक्या बहिणींना पैसे दिले गेले, आता ते परत मागण्यात काहीच अर्थ नाही. ते आता मागण्यात येवू नये. पण याच्यापुढे लोकांना सांगावं. जे नियमात नाहीत, त्यांनी स्वतःहून यादीतील नावे काढून घ्यावे. अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास त्यांच्याकडून दंडासह वसुली करता येईल. जे झाले ते, लाडक्या बहिणींना अर्पण केलं, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. 
 


सम्बन्धित सामग्री