Monday, September 01, 2025 08:54:00 AM

CBSC बारावीचा निकाल 2025 कधी जाहीर होणार? स्कोअरकार्ड पीडीएफ डाउनलोड होणार 'या' अधिकृत वेबसाइटवर

CBSE इयत्ता 12 वी परीक्षा 4 एप्रिल 2025 रोजी संपल्यानंतर आता सर्वांच्या नजरा बारावीच्या निकालावर खिळल्या आहेत. निकाल परीक्षा संपल्यानंतर 40 ते 45 दिवसांच्या आत जाहीर केला जातो.

cbsc बारावीचा निकाल 2025 कधी जाहीर होणार स्कोअरकार्ड पीडीएफ डाउनलोड होणार या अधिकृत वेबसाइटवर

मुंबई: CBSE इयत्ता 12 वी परीक्षा 4 एप्रिल 2025 रोजी संपल्यानंतर आता सर्वांच्या नजरा बारावीच्या निकालावर लागल्या आहेत. यंदाही निकाल 15 ते 20 मे दरम्यान घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षीचा ट्रेंड पाहता, निकाल परीक्षा संपल्यानंतर 40 ते 45 दिवसांच्या आत जाहीर केला जातो. त्यामुळे यंदा 20 मे 2025 पर्यंत बारावीचा निकाल समोर येण्याची दाट शक्यता आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइट्स  cbse.gov.in किंवा https://results.cbse.nic.in/  वरून आपले स्कोअरकार्ड पाहू आणि डाउनलोड करू शकतील. त्यासाठी अर्ज क्रमांक व जन्मतारीख या लॉगिन डिटेल्सची गरज भासेल. स्क्रीनवर स्कोअरकार्ड PDF स्वरूपात उपलब्ध होईल, ज्याचे विद्यार्थी प्रिंट घेऊन पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी वापर करू शकतात.

हेही वाचा: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार; दहावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट

गेल्या वर्षी 2 एप्रिलला परीक्षा पूर्ण झाल्यानंतर, 13 मे रोजी निकाल जाहीर झाला होता. यंदाही त्याच प्रमाणे वेळापत्रक राहिल्यास, 12 वीचा निकाल 20 मेच्या आत येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवर अपडेट तपासावे.

दहावीच्या निकालासाठीही विद्यार्थी तेवढेच उत्सुक आहेत. यावर्षी तब्बल 24.12 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. ही परीक्षा 18 मार्च रोजी पूर्ण झाली असून, निकाल बारावीच्या निकालासोबतच किंवा त्याच्या अगोदर कधीही जाहीर होऊ शकतो. निकालाची खात्रीशीर माहिती आणि अचूक तारखेसाठी अधिकृत वेबसाइट्सवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.


सम्बन्धित सामग्री