भाजप आमदार सुरेश धस यांचा वादात अडकलेला कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याचा पैसे उडवतानाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंजली दमानिया यांनी एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सतीश उर्फ खोक्या भोसले याचा बीडमध्ये ढाकणे पिता-पुत्राला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी भोसलेवर गुन्हा दाखल झाला आहे परंतु अद्यापही त्याला अटक करण्यात आलेली नाही. त्यातच आता पन्हे एकदा सतीश उर्फ खोक्या भोसले याचा पैसे उडवतानाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सतीश भोसले एका खोलीत टेबलावर नोटांचे बरेचसे बंडल समोर ठेवून बसलेला दिसून येतोय, आणि पैशांची उधळपट्टी करतोय. सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्यामुळे आता भाजप आमदार सुरेश धस हे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा: Devendra Fadanvis vs Uddhav Thackeray: स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही- देवेंद्र फडणवीस
कोण आहे सतीश उर्फ खोक्या भोसले?
सतीश भोसले बीडच्या शिरूर शहराजवळीस पारधी वस्तीवर राहतो
सतीश भोसले मित्रांसोबत लॅविश लाईफ जगतो
गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणात सहभाग
भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक
शिरूर कासार परिसरात सतीश भोसलेची खोक्या पार्टी नावानं दहशत
गोल्डमॅन म्हणूनही स्थानिक पातळीवर सतीश भोसलेची ओळख
दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांचा वादात अडकलेला कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याचा पैसे उडवतानाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंजली दमानिया यांनी एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सर्वत्र चांगलाच व्हायरल झाला असून नेमकं आता हे प्रकरण काय वळण घेतंय हे पाहून महत्वाचं ठरणारे.