मुंबई : जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या बद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरातून आंदोलने केली जात आहेत. हिंदूंच्या भावना दुखावल्याने सर्व स्तरातून वडेट्टीवारांविरोधात नागरिक संतप्त झाले आहेत.
आज पालघरमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं. विजय वडेट्टीवार यांनी हिंदू धर्मांच्या भावना दुखावल्याचा असल्याचा आरोप यावेळी हिंदू संघटनांकडून करण्यात आला. पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चानंतर पालघर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. नरेंद्र महाराजांविरोधात वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन पालघरमध्ये हिंदू संघटना आक्रमक चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : PM Kisan: पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 'या' दिवशी जारी केला जाणार; योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या..
नरेंद्र महाराजांविरोधात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पालघरमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याने हिंदू धर्मांच्या भावना दुखावल्याचा असल्याचा आरोप यावेळी हिंदू संघटनांकडून करण्यात आला . पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर पालघर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वडेट्टीवारांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेध मोर्चात हिंदू संघटनांच्या महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला असून वडेट्टीवार यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढणार?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराजांबदद्ल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्याने राज्यभरात आंदोलन केले जात आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी विजय वडेट्टीवारांनी अपमानास्पद वक्तव्य केले होते. नरेंद्र महाराज स्वतः मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज करणार तक्रार दाखल करणार आहेत. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे नरेंद्र महाराजांसोबत तक्रार दाखल करणार आहेत. नरेंद्र महाराजांच्या अनुयायांकडून वडेट्टीवारांविरोधात राज्यभर तीव्र निदर्शने केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.