धाराशिव: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गेल्या दोन वर्षात मराठा आंदोलक मनोज जरांगेंसह मराठा आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. परंतु आझाद मैदानावरील आंदोलनानंतर मराठा समाजााच्या सहा मागण्या मान्य करण्यात आल्या. फडणवीसांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर वेळीच तोडगा काढून आंदोलकांना शांत केलं. तेव्हापासून मनोज जरांगे यांच्याकडून फडणवीसांचंं कौतुक होताना पाहायला मिळतं. आता पुन्हा एकदा धाराशिव येथील एका कार्यक्रमात मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना काकाजी असे संबोधले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत त्यांना काकाजी असे संबोधले आहे. फडणवीस काकांनी सध्या मराठ्यांसोबत जुळवून घेतलंय, जे समाजाचं चांगलं करत असतील आम्ही त्याच्यासोबत आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरही गुलाल पडणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.
हेही वाचा: Uddhav Thackeray: 'समाज कंटकांना अशी कृती करून महाराष्ट्र पेटवायचा...', मीनाताईंच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक
"फडणवीस काकांनी मराठ्यांसोबत जुळवून घेतले आहे. त्यांनी आता हैदराबाद गॅझेटचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आमचं भलं केलं आम्ही त्यांचं कौतुक करू त्यांच्यासोबत राहणार आहे. आम्ही वर्षावर आणि त्यांच्यावरही गुलाल उधळणार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरही गुलाल उधळणार आहे. आमचा आरक्षणाचा प्रश्न सुटला की, आम्ही गुलाल उधळणार आहे. त्यांनी आमचा प्रश्न सोडवला मग आम्ही त्यांचं कौतुक करणारच आहे" असे मनोज जरांगे म्हटले.