Sunday, August 31, 2025 05:34:52 PM

अनोळखी महिलेला 'तू सडपातळ, स्मार्ट, गोरी किंवा बारीक आहेस' म्हटल्यावर होणार शिक्षा; न्यायालयाने असा निर्णय का दिला?

मुंबई सत्र न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना एखाद्या अनोळखी महिलेला 'तू सडपातळ आहेस, खूप हुशार आहेस आणि गोरी दिसतेस, मला तू आवडतेस...' असे संदेश पाठवणे अश्लीलता असल्याचे म्हटले आहे.

अनोळखी महिलेला तू सडपातळ स्मार्ट गोरी किंवा बारीक आहेस म्हटल्यावर होणार शिक्षा  न्यायालयाने असा निर्णय का दिला
Court Remarks On Obscenity
Edited Image

Mumbai Sessions Court Remarks On Obscenity: देशात दररोज महिलांवर अत्याचाराच्या अनेक घटना घडत असतात. यातील अनेक प्रकरणांच्या सुनावणीवर न्यायालय महत्त्वपूर्ण देत असतात. नुकतेच मुंबई सत्र न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना रात्रीच्या वेळी एखाद्या अनोळखी महिलेला 'तू सडपातळ आहेस, खूप हुशार आहेस आणि गोरी दिसतेस, मला तू आवडतेस...' असे संदेश पाठवणे अश्लीलता असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. माजी नगरसेवकाला व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवल्याबद्दल एका व्यक्तीची शिक्षा कायम ठेवताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश (दिंडोशी) डी.जी. ढोबळे यांनी हे निरीक्षण नोंदवले. 

काय आहे नेमक प्रकरण? 

मुंबई सत्र न्यायालयाने यासंदर्भात 18 फेब्रुवारी रोजी एक आदेश दिला, ज्यात न्यायालयाने आरोपीची शिक्षा कायम ठेवली. मुंबई सत्र न्यायालयाने म्हटले आहे की, रात्री 11 ते 12.30 च्या दरम्यान तक्रारदाराला फोटो आणि संदेश पाठवण्यात आले. यामध्ये  'तू सडपातळ आहेस', 'तू खूप हुशार आहेस', 'तू गोरी आहेस', 'मी 40 वर्षांची आहे', 'तू विवाहित आहेस की नाही?' 'मला तू आवडतेस', अशा आशयाचे संदेश होते.

हेही वाचा 'पप्पांनी मम्मीला मारलं, मग...' 4 वर्षांच्या मुलीने काढलेल्या चित्रामुळे आईच्या खुनाचा उलगडा, पोलिसही अवाक्

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने म्हटले आहे की कोणतीही विवाहित महिला किंवा तिचा पती अशा व्हॉट्सअॅप संदेश आणि अश्लील फोटो सहन करणार नाही,   विशेषतः जेव्हा पाठवणारा आणि तक्रारदार एकमेकांना ओळखत नसतील. न्यायालयाने म्हटले की, तक्रारदार आणि आरोपी यांच्यात ओळखीचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे अनोळखी महिलेला अशा प्रकारचे संदेश पाठवणे अश्लीलता आहे.   

न्यायालयाने फेटाळला आरोपीचा युक्तिवाद - 

दरम्यान, न्यायाधीशांनी असे म्हटले की, हे संदेश आणि हे कृत्य महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करण्यासारखे आहे. यापूर्वी, 2022 मध्ये येथील एका दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते. त्यानंतर त्याला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात निर्णयाला आव्हान दिले. राजकीय वैमनस्यामुळे आपल्याला या प्रकरणात खोटे गोवण्यात आले आहे, असा आरोप आरोपीने केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा युक्तिवाद फेटाळून लावला आणि म्हटले की त्याच्याकडे हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत.

हेही वाचा -New Delhi Railway Station : चेंगराचेंगरीनंतर कडेकोट बंदोबस्त, लक्ष वेधून घेतेय लेकराला उराशी धरून कर्तव्य बजावणारी आई

आरोपीने महिलेला पाठवले अश्लील मेसेज - 

तथापी, न्यायालयाने म्हटले आहे की, कोणतीही महिला आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवून तिची प्रतिष्ठा पणाला लावणार नाही. आरोपी पक्षाने हे सिद्ध केले आहे की आरोपीने महिलेला व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश आणि चित्रे पाठवली होती. म्हणून, कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून आणि शिक्षा देऊन योग्य केले. 
 


सम्बन्धित सामग्री