Wednesday, August 20, 2025 01:40:21 PM

बाजारात डिजिटल रुपया! मोबिक्विक आणि क्रेडची नवी क्रांती; सामान्य चलनापेक्षा वेगळा कसा?

डिजिटल रुपया हा भारतीय रुपयाचे इलेक्ट्रॉनिक रूप आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे नियंत्रण ठेवते आणि तो पारंपरिक कागदी नोटांप्रमाणेच व्यवहारासाठी वापरला जातो.

बाजारात डिजिटल रुपया मोबिक्विक आणि क्रेडची नवी क्रांती सामान्य चलनापेक्षा वेगळा कसा

भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात नवा टप्पा गाठत MobiKwik आणि Cred यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि Yes Bank च्या सहकार्याने डिजिटल रुपया (CBDC) सादर केला आहे.

डिजिटल रुपया म्हणजे काय?

डिजिटल रुपया हा भारतीय रुपयाचे इलेक्ट्रॉनिक रूप आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे नियंत्रण ठेवते आणि तो पारंपरिक कागदी नोटांप्रमाणेच व्यवहारासाठी वापरला जातो. मात्र, हा पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असल्याने पेमेंट सोपे, जलद आणि सुरक्षित होते.

हेही वाचा 👉🏻  मध्यमवर्गीयांना 2025-26 च्या केंद्रीय बजेटमध्ये करसवलतीची अपेक्षा 

सामान्य चलनापेक्षा वेगळा कसा?
    1.    स्मार्ट व्यवहार – डिजिटल रुपया UPI सारख्या सुविधांसोबत सहज वापरता येतो.
    2.    कॅशलेस आणि पेपरलेस – कागदी नोटा वापरण्याची गरज नाही.
    3.    सरकारी मान्यता आणि सुरक्षितता – सामान्य डिजिटल वॉलेटपेक्षा जास्त सुरक्षित, कारण तो RBI द्वारे नियंत्रित आहे.
    4.    २ प्रकारात उपलब्ध –
    •    CBDC-R (Retail) – सर्वसामान्य नागरिकांसाठी दैनंदिन व्यवहारांसाठी.
    •    CBDC-W (Wholesale) – वित्तीय संस्थांसाठी मोठ्या प्रमाणातील व्यवहारासाठी.

हेही वाचा 👉🏻 भारतात जुने iPhone खरेदी करण्याचा नवा ट्रेंड!

कसे वापरता येईल?

MobiKwik ई-रुपी वॉलेट हे पहिलं डिजिटल वॉलेट आहे, जे Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. वापरकर्ते ई-रुपी वॉलेटद्वारे पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकतात, अगदी UPI प्रमाणेच.

डिजिटल रुपयामुळे भारतात कॅशलेस व्यवहारांना वेग येईल, भ्रष्टाचार कमी होईल आणि आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक होतील. ही नव्या युगाची डिजिटल क्रांती आहे!

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 


सम्बन्धित सामग्री