Wednesday, September 03, 2025 08:12:50 PM

Zomato Hikes Platform Fee: ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे झाले महाग; झोमॅटोने प्लॅटफॉर्म फीमध्ये केली 20 टक्के वाढ

लोकप्रिय अन्न वितरण कंपनी झोमॅटोने त्यांच्या सेवांवरील प्लॅटफॉर्म शुल्कात 20% वाढ केली आहे. आता ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरसाठी 12 रुपये प्लॅटफॉर्म फी द्यावी लागणार आहे, जी याआधी 10 होती.

zomato hikes platform fee ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे झाले महाग झोमॅटोने प्लॅटफॉर्म फीमध्ये केली 20 टक्के वाढ

Zomato Hikes Platform Fee: ऑनलाइन अन्न ऑर्डर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अन्न वितरण कंपनी झोमॅटोने त्यांच्या सेवांवरील प्लॅटफॉर्म शुल्कात 20% वाढ केली आहे. आता ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरसाठी 12 रुपये प्लॅटफॉर्म फी द्यावी लागणार आहे, जी याआधी 10 होती.

नफा वाढवण्यासाठी रणनीती

कंपनीने ही वाढ सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर केली असून, त्यामागचा उद्देश प्रत्येक ऑर्डर अधिक नफ्यात आणणे हा आहे. झोमॅटोने एप्रिल 2023 मध्ये प्रथमच प्लॅटफॉर्म फी आकारण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ही फी केवळ 2 रुपये होती. गेल्या अडीच वर्षांत या शुल्कात टप्प्याटप्प्याने वाढ करत आता ती 12 रुपयांवर पोहोचली आहे.

हेही वाचा - Share Market: चीन-भारत मैत्रीचा शेअर बाजारावर परिणाम; धातूंच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ

महसुलात मोठी वाढ

अहवालानुसार, झोमॅटो देशभरात दररोज 23 ते 25 लाख ऑर्डर्स वितरित करते. नवीन फी संरचनेनुसार, कंपनीला दररोज सुमारे 3 कोटींचे उत्पन्न फक्त प्लॅटफॉर्म शुल्कातून मिळेल. याआधी हे उत्पन्न सुमारे 2.5 कोटी होते. अशा प्रकारे, कंपनीला तिमाहीत सुमारे 45 कोटींचा अतिरिक्त महसूल मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - GST Council Meeting 2025: जीएसटी कौन्सिलची बैठक आजपासून सुरू; कर स्लॅब कपातीबाबत मोठा निर्णय होणार

इतर शुल्क देखील लागू

ग्राहकांना प्लॅटफॉर्म फी व्यतिरिक्त डिलिव्हरी शुल्क, रेस्टॉरंट शुल्क आणि जीएसटी देखील द्यावे लागतात. त्यामुळे ऑनलाइन अन्न ऑर्डर करणे आधीपेक्षा महाग झाले आहे. याशिवाय, झोमॅटोप्रमाणेच स्विगी देखील प्रत्येक ऑर्डरवर प्लॅटफॉर्म आणि डिलिव्हरी शुल्क आकारते. झोमॅटो आणि स्विगी सारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्समुळे ग्राहकांना घरबसल्या अन्न मिळत असले तरी, शुल्कात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे त्यांचा खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री