SEBI Penalty On Axis Securities
Edited Image
SEBI Slaps 10 Lakh Penalty On Axis Securities: शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी (SEBI) ने अॅक्सिस सिक्युरिटीज लिमिटेड (Axis Securities Limited) विरुद्ध मोठी कारवाई केली आहे. सेबीने अॅक्सिस सिक्युरिटीजवर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. स्टॉक ब्रोकर नियम आणि नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. ब्रोकरेज फर्मला हा दंड 45 दिवसांच्या आत भरावा लागेल.
अॅक्सिस सिक्युरिटीज नियामक प्रक्रियांचे पालन करण्यात अयशस्वी -
सेबीने म्हटले आहे की, अॅक्सिस सिक्युरिटीज अनेक बाबींवर नियामक प्रक्रियांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली आहे. यामध्ये विसंगती आणि क्लायंट निधीचे अयोग्य व्यवस्थापन नोंदवणे समाविष्ट आहे. एप्रिल 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी सेबीने अॅक्सिस सिक्युरिटीजची चौकशी केली होती. त्यानंतर सेबीने ही कारवाई केली आहे.
हेही वाचा - दररोज 27 कोटी रुपयांपर्यंत देणगी देणारे भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती तुम्हाला माहित आहेत का?
तथापी, सेबीच्या तपासात असे उघकीस आले की, अॅक्सिस सिक्युरिटीजने क्लायंटकडून मिळालेल्या पसंतीनुसार क्लायंटचे निधी आणि सिक्युरिटीज सेटल केले नाहीत. तसेच, खात्याच्या तपशीलांसह रिटेन्शन स्टेटमेंट उपलब्ध करून देण्यात ते अयशस्वी झाले. तसेच ब्रोकरेज फर्मने आगाऊ/नॉन-अपफ्रंट मार्जिनच्या कमी वसुलीसाठी स्टॉक एक्सचेंजने लावलेला दंड तिच्या ग्राहकांना दिला.
हेही वाचा - सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! 'या' सरकारी बँकेने स्वस्त केले Home Loan आणि Car Loan
ग्राहकांच्या तक्रारींचे योग्य निराकरण केले नाही -
सेबीच्या निरीक्षणानुसार, अॅक्सिस सिक्युरिटीजने क्रेडिट बॅलन्स असलेल्या क्लायंटच्या सिक्युरिटीज क्लायंटच्या न भरलेल्या सिक्युरिटीज खात्यात हस्तांतरित केल्या आहेत. याशिवाय, ग्राहकांच्या तक्रारींचे योग्य निराकरण झाले नाही. तथापी, गेल्या महिन्यातच, सेबीने फ्रंट रनिंगच्या प्रकरणात 8 कंपन्यांना सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी घातली होती. 'फ्रंट-रनिंग' म्हणजे शेअर बाजारातील एक बेकायदेशीर प्रथा जिथे एखादी संस्था ब्रोकर किंवा विश्लेषकांकडून मिळालेल्या गैर-सार्वजनिक माहितीच्या आधारे व्यवहार करते.