Reliance Jio IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने शुक्रवारी झालेल्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठी घोषणा केली. या सभेत कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी उपकंपनी रिलायन्स जिओच्या IPO ची तयारी सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, आज मला अभिमानाने सांगायचे आहे की Jio आपल्या IPO साठी सज्ज होत आहे. Reliance Jio कदाचित 2026 च्या पहिल्या सहामाहीत शेअर बाजारात सूचीबद्ध होईल.
IPO म्हणजे काय?
IPO म्हणजे प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग. या प्रक्रियेद्वारे एखादी खाजगी कंपनी प्रथमच आपले शेअर्स सर्वसामान्य लोकांसाठी खुले करते. यामुळे कंपनी खाजगीतून सार्वजनिक स्वरूपात रूपांतरित होते. IPO साठी कंपनीला नियामक संस्था SEBI ची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर कंपनीचे शेअर्स BSE किंवा NSE सारख्या शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातात, ज्यात गुंतवणूकदार सहज गुंतवणूक करू शकतात.
हेही वाचा - Health Insurance: वैद्यकीय महागाईमुळे ‘या’ दोन हेल्थ इन्शुरन्सची कॅशलेस सुविधा बंद; रुग्णांसमोर नवीन संकट
रिलायन्स इंटेलिजेंसची स्थापना -
या AGM मध्ये मुकेश अंबानींनी आणखी एक महत्वाची घोषणा केली. त्यांनी रिलायन्स इंटेलिजेंस नावाची नवीन पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी मोठ्या प्रमाणात एआय पायाभूत सुविधा उभारेल. कंपनीचे उद्दिष्ट गिगावॅट-स्केल, एआय-रेडी डेटा सेंटर्स उभारणे आहे, जे ग्रीन एनर्जीवर चालतील. याशिवाय, मेटा आणि गुगलसारख्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांसोबतही भागीदारी केली जाणार आहे.
हेही वाचा - GST च्या नव्या नियमामुळे घर खरेदी होणार स्वस्त,जाणून घ्या सविस्तर
रिलायन्स रिटेलचा वेगवान विस्तार
AGM दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक ईशा अंबानी यांनी रिटेल क्षेत्राच्या प्रगतीबाबत भाष्य केले. त्यांनी सांगितले की, रिलायन्स रिटेल पुढील तीन वर्षांत 20 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दराने (CAGR) विस्तारेल. ऑनलाइन विक्री आणि जलद वाणिज्य सेवा यामुळे रिटेल व्यवसाय अधिक मजबूत होत आहे. येत्या काळात महसुलापैकी सुमारे 20 टक्के हिस्सा डिजिटल माध्यमांतून मिळण्याची अपेक्षा आहे.