Wednesday, August 20, 2025 01:01:08 PM

Dadar Kabutar Khana Controversy: दादरमध्ये राडा, ताडपत्री फाडून थेट कबुतरखान्यात शिरले, जैन समाज आक्रमक

मुंबईतील दादरमध्ये महापालिकेने घातलेल्या ताडपत्र्यांवरुन आज राडा झाला आहे. जैन समाजाच्या आंदोलकांकडून कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आणि बांबू काढून टाकण्यात आले.

dadar kabutar khana controversy दादरमध्ये राडा ताडपत्री फाडून थेट कबुतरखान्यात शिरले जैन समाज आक्रमक

Dadar Kabutar Khana Controversy: मुंबईतील दादरमध्ये महापालिकेने घातलेल्या ताडपत्र्यांवरुन आज राडा झाला आहे. जैन समाजाच्या आंदोलकांकडून कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आणि बांबू काढून टाकण्यात आले. यानंतर पोलीस आणि जैन आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मुंबईतील कबुतरखाने हटवण्याचे निर्देश महापालिकेला दिले. या पार्श्वभूमीवर दादर पश्चिमेतील कबुतरखाना लवकरात लवकर हटवावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसन आणि फुफ्फुसांचे आजार पसरत असल्याने दादर येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. 

महापालिकेने दादरमधील कबुतर खान्यावर ताडपत्री टाकल्याने जैन चिडले आणि कबुतरखान्यात उतरले. कबुतरखाना हटवण्यावरुन राडा सुरु आहे. जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जैन आंदोलकांनी कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री काढले. या दरम्यान पोलीस आणि जैन आंदोलकांमध्ये झटापट झाली.   

दरम्यान हे आंदोलन म्हणजे अतिरेकीपणा आहे. कबुतरांमुळे सर्वत्र अस्वच्छता झाली आहे. तसेच कबुतरांमुळे श्वसनविकार होत असल्याचे शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे. तसेच जैन समंजस असतात. न्यायालयाचा सन्मान करावा असा सल्ला भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी दिला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कबुतरांवरुन राजकारण करणं अयोग्य असल्याचे सांगितले आहे. मुक्या पक्षांचा छळ कशाला असेही त्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा: Uttarakhand: उत्तरकाशीमध्ये खीर गंगा नदीचं रौद्ररुप; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कबुतरांमुळे होतं काय ? 
कबुतरांमुळे श्वसनाचे आजार बळावतात. अॅलर्जी, अस्थमा होण्याची शक्यता असते. कबुतरांची विष्ठा आणि पंखामुळे आजार होतात. 
विष्ठेत अस्परजिलस बुरशी असते. ही बुरशी श्वसातून शरीरात गेल्यास आजाराचा धोका संभवतो. हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. श्वसननलिकेला सूज येण्याचीही शक्यता असते. फुफ्फुसांना सूज येण्याची शक्यता. कबुरतखान्याच्या ठिकाणी अन्न टाकल्यास 500रु दंड राज्य सरकारकडून घेण्यात येणार आहे. श्वसनाचे आजार बळावत असल्यानं त्यांना खाणं टाकू नये. 


सम्बन्धित सामग्री