मुंबई : पश्चिम रेल्वेकडून 13 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. आज रात्री 10 वाजल्यापासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला आहे. ब्लॉकदरम्यान 168 लोकलच्या फेऱ्या रद्द होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.
पश्चिम रेल्वेने अप-डाउन जलद मार्गावर 13 तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. शनिवार रात्री 10 वाजल्यापासून रविवार सकाळी 11 वाजेपर्यंत असलेल्या या ब्लॉकमध्ये 168 लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. मध्य रेल्वेने यापूर्वीच सीएसएमटी ते भायखळा/वडाळा रोड या दरम्यान 10 तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे 227 लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत.
हेही वाचा : हायसिक्युरिटी नंबरप्लेटसाठी लूटमार?
पश्चिम रेल्वेवरील 13 तासांच्या ब्लॉकमुळे जलद मार्गावरील अप आणि डाउन जलद गाड्यां ची वाहतूक अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. चर्चगेटला येणाऱ्या काही गाड्या वांद्रे आणि दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार असून, त्याच स्थानकातून परतीचा प्रवास सुरू करणार आहेत. ब्लॉकमुळे शनिवारी रात्री 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत 26 आणि रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत 142 फेऱ्या रद्द राहणार आहेत.
या मेगाब्लॉक दरम्यान चर्चगेटला येणाऱ्या काही गाड्या वांद्रे आणि दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान पुलाच्या गर्डर उभारणीचं काम चालु असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवरही 10 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे 227 लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत.