लग्नानंतर नवरा-नवरी 3 दिवस टॉयलेटला जाऊ शकत नाहीत, कारण वाचून 'शॉक' व्हाल
जगभरात लग्नासोबत अनेक विचित्र परंपरा जोडलेल्या आहेत. काही ठिकाणी वधूला लग्नाआधी प्राण्याशी लग्न लावले जातं. तर काही ठिकाणी लग्नाच्या पहिल्या रात्री वधूच्या आईला खोलीत उपस्थित राहावे लागतं. इंडोनेशियाच्या बोर्नियो प्रांतात टिडॉन्ग नावाच्या जमातीमध्ये एक अत्यंत अनोखी आणि कठीण परंपरा पाळली जातं आहे.
टिडॉन्ग या जमातीत नवविवाहित जोडप्याने लग्नानंतर सलग तीन दिवस टॉयलेटला जाऊ नये, अशी सक्त सूचना असते. या परंपरेनुसार जर वधू-वर शौचालयाला गेल्यास त्यांना अपवित्र मानलं जातं. त्यां जोडप्याच्या नात्यात कटुता निर्माण होऊ शकतं, असा त्यांचा कयास आहे. ही प्रथा नवविवाहित जोडप्याच्या शुद्धतेसाठी असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
हेही वाचा - इजिप्तमधील मंदिराच्या उत्खननात सापडला 2600 वर्षे जुना गूढ खजिना, लकाकतं सोनं आणि देवांच्या मूर्ती पाहून सर्वजण थक्क
ही परंपरा पाळण्यासाठी वधू-वरांवर घरच्यांची सतत नजर असते. त्यांना तीन दिवस कमी प्रमाणात अन्न आणि पाणी दिलं जातं. जेणेकरून त्यांना शौचास जाण्याची गरज भासू नये. अनेक वेळा त्यांना खोलीतच कोंडून ठेवले जातं. त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जातं आणि कोणीही नियम मोडण्याचा प्रयत्न करणार नाही याची खात्री केली जाते.
या परंपरेमागील आणखी एक कारण म्हणजे वाईट शक्तींपासून संरक्षण करणं आहे. स्थानिकांच्या मते, ज्या ठिकाणी मलमूत्र टाकले जातं. तिथं अशुद्धता असते आणि त्यामुळं वाईट शक्ती तिथं जास्त प्रमाणात असतात. जर नवविवाहित दाम्पत्य अशा ठिकाणी गेल्यास त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात.
हेही वाचा - चाक राहिलं खाली अन् यांचं विमान हवेत! लँड करताना पाकिस्तानी पायलट आणि अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट..!
टिडॉन्ग जमातीतील लोकांच्या मते, जर एखाद्या जोडप्यानं ही परंपरा यशस्वीरित्या पाळल्यास त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखकर राहतं. पण जर कोणी हा नियम मोडला. तर त्यांच्या वैवाहिक नात्यात अडथळे निर्माण होतात. या परंपरेचं उल्लंघन केल्यास जोडप्याच्या आयुष्यात मोठं संकट येऊ शकतं किंवा त्यांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतं, असा लोकांचा विश्वास आहे.