Employee Left Job on His First Day : दिल्लीतील एका स्टार्टअपमध्ये नोकरीच्या पहिल्याच दिवशी, एक कर्मचारी त्याच्या खुर्चीवरून गायब झाला आणि परतलाच नाही. या कर्मचाऱ्याने जेवणाच्या सुट्टीच्या वेळी त्याचा लॅपटॉप ऑफिस डेस्कवर ठेवला आणि तो सरळ तेथून निघून गेला. इतकेच नाही तर, तो कुठे आहे, हे विचारण्यासाठी त्याच्या टीम लीडने त्याला फोन केला होतो. मात्र, त्याने टीम लीडच्या कॉललाही उत्तर दिले नाही. परंतु, नंतर जेव्हा एचआरने त्याच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्याने असे काही उत्तर दिले की, इंटरनेटवर खळबळ उडाली.
अलीकडेच, दिल्लीतील एका स्टार्टअपमध्ये अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे इंटरनेटवर वातावरण खूप तापले आहे. पहिल्याच दिवशी जेवणाच्या सुट्टीच्या वेळी एक नवीन कर्मचारी आपली खुर्ची सोडून थेट निघूनच गेला आणि पुन्हा ऑफिसमध्ये कधीही दिसला नाही. त्याने कंपनीचा लॅपटॉप डेस्कवर ठेवला आणि कोणतीही सूचना न देता तो तिथून निघून गेला.
कर्मचाऱ्याच्या टीम लीड आणि एचआरने त्याला फोन कॉल आणि मेसेज पाठवले; परंतु, अनेकदिल्लीतील एका स्टार्टअपमध्ये अशी घटना समोर आली आहे तास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी, या कर्मचाऱ्याने एचआरच्या कॉलला प्रतिसाद दिला आणि 'मी हे काम करू शकत नाही' असे म्हटले. कर्मचाऱ्याने कोणतेही स्पष्टीकरण किंवा कारण दिले नाही. तर, त्याने फक्त तेथे काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला.
ही स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली
ही संपूर्ण स्टोरी एक X वापरकर्ता @Poan__Sapdi ने शेअर केली आहे. त्याने हा त्याच्या मित्राचा अनुभव असल्याचे म्हटले आहे. वापरकर्त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'एका मित्राने मला दिल्लीतील एका स्टार्टअपमध्ये कामावर रुजू झालेल्या एका मुलाबद्दल सांगितले. तो त्याच्या पहिल्याच दिवशी जेवणाच्या वेळी डेस्कवर लॅपटॉप ठेवून निघून गेला, तो परतलाच नाही. सुरुवातीला, त्याने सर्वांच्या कॉलकडे दुर्लक्ष केले. परंतु, नंतर त्याने एचआरचा फोन उचलला आणि फक्त असे म्हटले की, तो तिथे काम करू शकत नाही'.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि लोकांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी याला "धाडसी पाऊल" म्हटले तर अनेकांनी त्यांचे स्वतःचे अशाच प्रकारचे अनुभव शेअर केले. एका वापरकर्त्याने विनोदाने लिहिले की, खरे हिरो ते असतात, जे त्यांचा पगार मिळाल्यानंतरच कंपनी सोडतात. (काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार समोर आला होता. पगार जमा झाल्यानंतर लगेच एका कर्मचाऱ्याने राजीनामा एचआरकडे पाठवून दिला होता.)
हेही वाचा - Viral Video : फाटक बंद होतं.. या महाभागाने बाईक उचलून रेल्वे ट्रॅक ओलांडला; ताकद आहे.. पण वापर कुठे करावा?
काहीही असले तरी, या प्रकरणामुळे कामाच्या ठिकाणची संस्कृती आणि कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कर्मचाऱ्याने अचानक पहिल्याच दिवशी नोकरी सोडण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, नेटिझन्सनी त्याच्या निर्णायकपणाचे कौतुक केले. काहींनी असा अंदाज लावला की, हा प्रकार कामाच्या विषारी वातावरणाचे किंवा अपेक्षांमधील विसंगती दर्शवते.
मानसिक समाधान
इतर काही युजर्सनीही असेच अनुभव शेअर करत, मानसिक समाधान आणि कामाच्या ठिकाणच्या सकारात्मक वातावरणाला प्राधान्य देण्याच्या वाढत्या ट्रेंडवर प्रकाश टाकला.
आणखी एकाने गंभीरपणे म्हटले, “मानसिक शांतता ही सर्वात महत्वाची आहे, जर पहिल्या दिवशी काहीतरी बरोबर वाटत नसेल तर तिथे का थांबायचे?”दुसरा एक युजर म्हणाला, “प्रत्येकाने आपले मानसिक समाधान जपण्याचे धाडस केले पाहिजे.” तर आणखी एक युजर म्हणाला, “कणा ताठ ठेवल्याबद्दल मला त्याचा आदर वाटतो.”
कार्यपद्धतीवर (Work Culture) प्रश्न उपस्थित केले
या घटनेमुळे स्टार्टअपमध्ये खूप दबावाने भरलेली स्थिती झाली आहे का असा मोठा वाद निर्माण झाला? अनेकांनी म्हटले की तरुण पिढी आता तडजोड करत नाही. जर कामाचे वातावरण योग्य वाटत नसेल तर लगेच निर्णय घेणे चांगले.
अशा अनेक टिप्पण्या देखील होत्या जिथे लोकांनी त्या कर्मचाऱ्याचे कौतुक केले आणि म्हटले की प्रत्येकजण इतका धाडसी नसतो की तो पहिल्या दिवशी त्याच्या मर्यादा समजून घेतो. दुसऱ्याने म्हटले, ही स्वाभिमानाची बाब आहे. करिअरच्या आधी स्वतःला ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
'विचित्र आहे; पण आश्चर्यकारक नाही'
आणखी एका युजरने लिहिले की, “हे विचित्र आहे, पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, आश्चर्यकारक नाही. स्टार्टअप संस्कृती दडपण आणणारी असू शकते आणि कधीकधी ते योग्य नसते. आपले मन कधीच चुकीचे मार्गदर्शन करत नाही. ते जरी पहिल्याच दिवशी नोकरी सोडायला सांगत असेल, तरी त्याच्यावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे असते. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का?
हेही वाचा - Success Story: 'तुमच्यासारख्या लोकांना कधीच नोकरी मिळणार नाही', मुलाखतीत अपमान झालेल्या अर्पिताची गोष्ट