नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर मुद्द्यावरून संसदेतील वातावरण शिगेला पोहोचला आहे. यावेळी, संसदेत प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर टीकेचा वर्षाव केला. यावर, पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला रोखठोकपणे प्रत्युत्तर दिले. मोदी म्हणाले की, 'मला जगभरातून सर्मथन मिळाले. पण दुर्भाग्य याचं आहे की माझ्या सैनिकांना काँग्रेसकडून समर्थन मिळाले नाही. 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसचे लोक उड्या मारत होते. कुठे गेली 56 इंचाची छाती? कुठे गेला मोदी? मोदी तर फेल झाला, काय मजा घेत होते आणि बाजी मारली असे त्यांना वाटत होते. दुर्दैव म्हणजे, पहलगाम हल्ल्यात मृत झालेल्या लोकांमध्ये ही काँग्रेस आपलं राजकारण शोधत होते. हे लोक माझ्यावर टीता करत होते. मात्र, त्यांच्या टीका आणि त्यांचा बालिशपणा देशाच्या सैन्यांचे मनोबल कमी करत होते'.
हेही वाचा: ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरुन? पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत थेट बोलले
पुढे, पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'भारताने 10 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते, यावरून इथे संसदेत खूप काही बोलले आहे. मात्र, हाच तो प्रपोगंडा आहे, जो सीमेपार पसरवला आहे. काही लोक हे सैन्यांनी दिलेल्या तथ्यांवर न बोलता पाकिस्तानने पुरवलेल्या खरं खोटं करण्यात धन्य मानत आहे. जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला होता, तेव्हा पाकव्याप्त भागात जाऊन भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केले. एक दिवसाच्या ऑपरेशनमध्ये जवान परतला आहे. बालाकोट एअरस्ट्राइक केल्यावर दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये लक्ष ठरलेले होते, दहशतवाद्यांचे एपी सेंटर होते, पहलगामच्या दहशतवाद्यांना जिथून ट्रेनिंग मिळाले, तिथेही भारतीय जवानांनी हल्ला केला.
पाकिस्तानने जर पुन्हा कुरापती काढल्या तर...
या दरम्यान, पाकड्यांना इशारा देत मोदी म्हणाले की, 'भारतीय सैन्यांच्या हल्ल्याने पाकिस्तानला मोठा फटका बसला होता. या हल्ल्यानंतर, पाकिस्तानने डीजीएसमोर विनवणी केली. आता खूप मारलं, आता बास करा. मी लोकशाहीच्या मंदिरात जाहीरपणे सांगत आहे की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. जर पाकिस्तानने पुन्हा कुरापती काढल्या तर जशास तसे उत्तर दिलं जाईल'.
हेही वाचा: अतिरेकी मेल्याचं तुम्हाला दुःख झालंय का?; अमित शाह यांचा विरोधकांना सवाल
काँग्रेसला टोला लगावत मोदी म्हणाले की, 'एकीकडे भारत आत्मनिर्भर होत आहे, तर दुसरीकडे मुद्दे काढण्यासाठी काँग्रेस पाकिस्तानच्या मुद्यावर जगत आहे. काँग्रेसला पाकिस्तानचे मुद्दे आणावे लागत आहे. मात्र, दुर्दैवाने काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पाकिस्तानचे प्रचारक बनले आहे. जेव्हा देशातील सैन्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता, तेव्हा काँग्रेसने सैन्याकडे पुरावे मागितले. तेव्हा, त्यांनी देशाचा सूर पाहिला, तेव्हा त्यांनी मूड बदलला आणि माघार घेतली. जेव्हा, बालकोटमध्ये एअरस्ट्राईक केले, तेव्हा त्याचे फोटो मागायला लागले. पायलट अभिनंदनला पकडलं गेलं. तेव्हा, पाकिस्तानात आनंदाचे वातावरण होते. त्यांनी लोकांची कानभरवणी करत म्हणाले की, आता मोदी फसला, अभिनंदन यांना आणून दाखवा, बघू मोदी काय करतो. जेव्हा अभिनंदन यांना भारतात आणले तेव्हा त्यांची बोलती बंद झाली होती'.