Wednesday, August 20, 2025 09:19:08 AM

Ashish Shelar: पहलगाममध्ये .....इथे लोकं जात विचारुन मारतायेत

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मनसे कार्यकर्त्यांची थेट दहशतवाद्यांशी तुलना केली आहे. पहलगाममध्ये धर्म विचारुन गोळ्या घातल्या. इथे लोक जात विचारुन मारतायेत असे मंत्री शेलार यांनी म्हटले आहे.

ashish shelar पहलगाममध्ये इथे लोकं जात विचारुन मारतायेत

मुंबई: सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मनसे कार्यकर्त्यांची थेट दहशतवाद्यांशी तुलना केली आहे. पहलगाममध्ये धर्म विचारुन गोळ्या घातल्या. इथे लोक जात विचारुन मारतायेत. निष्पाप हिंदूंना भाषा विचारुन चोपतायत असे मंत्री शेलार यांनी म्हटले आहे.  
 
मनसे कार्यकर्ते मराठी न बोलल्यानं करत असलेल्या मारहाणीवर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदूंना चोपण्यात तुम्हाला जो आनंद मिळतोय तो अख्खा महाराष्ट्र पाहतोय. पहलगाममध्ये धर्म विचारुन गोळ्या घातल्या. इथे लोकं जात विचारुन मारतायेत असे शेलारांनी मनसे कार्यकर्त्यांना म्हटले आहे. 

शनिवारी मी स्वतः वारीत सहभागी होऊन आलो. सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो. आज विठुरायाचा आशीर्वाद सगळ्यांना मिळू देत. मी व्यापारी नागरिक आणि भाविक सगळ्यांशी बोललो आहे. यावेळी वारीत राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेखीखाली अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या. खूप चांगल्या योजना सेवेसाठी दिल्या. आदर्श वाटावा अशी व्यवस्था यावेळी केली.

हेही वाचा: महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात?

'उद्धव यांच्या भाषणात सत्ता गेल्याचं दुःख'
शेलार म्हणाले, दोन भाऊ एकत्र आले छान झालं, दोन कुटुंब एकत्र आली आनंद झाला. कुटुंब एकत्र येण्यासाठी आम्ही कायम असतो. दोन पक्ष एकत्र येतील का, हा त्यांचा प्रश्न आहे. दोन पक्षांनी भूमिका घ्यायला ते तयार आहेत. शनिवारचा कार्यक्रम आणि मराठी भाषा त्यात झालेली भाषण आणि संपूर्ण इव्हेंट, एकच भाषण अपूर्ण, अप्रसंगिक आणि अवास्तव असा हा कार्यक्रम होता. विपर्यास करणारे मुद्दे होते. त्रिभाषा कोणी आणली, याबद्दल चुकीची माहिती दिली. देशात अन्य कुठली भाषा आहे हे गुगल करा. दुसऱ्याच भाषण अप्रसंगिक मूळ विषय सोडून भाषण केलं. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता गेल्याच दुःख दिसून आलं.

'उद्धव ठाकरेंचं भाषण अप्रासंगिक' 
शेलार यांनी राज ठाकरे यांचे भाषण अपूर्ण तर उद्धव ठाकरेंचं भाषण अप्रासंगिक होतं. शनिवारी ठाकरेंच्या भाषणात 'म' महापालिका दिसून आला. ज्यांच्याकडे बोलायचे मुद्दे नसतात ते विपर्यास करतात. अनाजी पंत म्हणजे काय? तुम्हाला नावं ठेवायची का आम्ही? असे सवाल त्यांनी केले. जातीवाचक बोलणं, टोमणे मारणं हेच त्यांना जमत अशी टीका शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

'ठाकरे बंधूंच्या भाषणात अप्रामाणिकपणा'
पुढे बोलताना, दोघांच्याही भाषणात तकलादूपणा होता, अप्रामाणिकपणा होता. प्रामाणिक असते तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला लागले असते. देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा शासन निर्णय मागे घेतला तर अभिनंदन का नाही केलं असा सवाल शेलारांनी ठाकरे बंधूंना केला. मराठी भाषेचा दर्जा हा निर्णय केला. तेव्हा या दोघांची तोंड बंदी होती. तेव्हा का अभिनंदन केलं नाही भाषेच्या विषयाशी घेणं देणं नाही. आम्ही हिंदीला विरोध नाही केला अडवाणी जी यांनी परवानगी दिली नाही. तुमची लेकरं त्या शाळेत शिकतील तिथे तीन भाषा शिकतील. हिंदुत्व अडवाणी जी यांना सोडलेली नाही असे शेलारांनी म्हटले. 


सम्बन्धित सामग्री